दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
महाराष्ट्र राज्यातील अनेक शहरांत परभणी घटनेचे पडसाद उमटले असून यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सुध्दा आज पडसाद उमटले आहे.
पुसद येथे परभणी येथील संविधान शिल्प विटंबना व काॅम्बिंग आप्रेशनच्या विरोधात जबरदस्त पडसाद उमटल्याचे वास्तव आहे.
पुसदच्या मुख्य मार्गाने निषेध रॅली काढण्यात आली असून या रॅलीत हजारोंच्या संख्येने बौद्ध बांधव व इतर बांधव सहभागी झाले होते.
या रॅलीत महाराष्ट्र शासनाचा – संबंधित प्रशासनाच्या कृतीचा निषेध करण्यात आला.