भगवान बुद्धांचा धम्मप्रचारासाठी तरुण युवकांनी पुढाकार घ्यावा.:- पूज्य भदंत बुनली यांनी मूर्ति वाटप कार्यक्रमामध्ये केले उद्धभोदन. — एशियन मेत्ता फाऊंडेशन,इंडीया आणि अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित 151 बुद्ध मूर्ति वितरण समारोह संपन्न.

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

       कन्हान( सिहोरा) दिनांक 16 डिसेंबर इंडो एशियन मेत्ता फाऊंडेशन, इंडीया आणि अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय शिक्षण संस्था यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित 151 बुद्ध मूर्ति वितरण समारोह आयोजित करण्यात आलेला होता.

                या कार्यक्रमासाठी थाईलेंड येथील पूज्य भिक्षू बूनली, भंते अश्वमेध, भंते रेवत, भंते विनाचार्य नवी दिल्ली,माजी खा. जोगेंद्र कवाडे, शिक्षणमहर्षी सुरेश गायकवाड, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

       

           यावेळी भगवान बुद्धांचा मूर्ति आदिलाबाद, हिंगोली, वाशीम, कोल्हापूर, कुशीनगर (यूपी),गडचिरोली, भंडारा, गोंदिया,मौदा, सावनेर, वाडी, आदी अनेक ठिकाणच्या बुद्ध विहारासाठी दान करण्यात आल्या.

                  कार्यक्रमाचे संचालन मुकेश बागडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सत्यजित जानराव यांनी केले. प्रास्ताविक नितिन गजभिये यांनी केले. भंते बूनली यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात तरुण पिढीला प्रेरणादायी विचार व्यक्त करत भगवान बुद्धांचा धम्म प्रचार प्रसारासाठी वाहुन नेण्यासाठी आव्हाहन केले.

                त्यासाठी पूज्य भदंत बूनली यांचा हस्ते धम्मदुत पुरस्काराने विविध राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांना सन्मानित करण्यात आले.

                यामध्ये प्रामुख्याने सोलापूर, उस्मानाबाद, बार्शी, बीड, लातूर, नांदेड, वाशीम, कोल्हापूर, नागपूर,आर्वी, अमरावती, अकोला, सौसर आदी अनेक राज्यांतील मान्यवरांना सन्मानीत करण्यात आले.

                  कार्यक्रमाचा सफल आयोजनासाठी स्मिता वाकडे, दिनेश शेंडे, स्नेहल नितिन गजभिये, राजू भेलावे, मनोज मेश्राम, मनोज बैतवर, रमेश गजभिये, सक्षम गजभिये, बॉबी गजभिये, प्रवीण गजभिये, सागर हुमणे, सारिका धारंगावे आदींनी अथक परिश्रम घेलेले.

                  पूज्य भदंत यांच्या प्रमुख उपस्थिति मध्ये यांच्या हस्ते 10 फूट ऊंचीची बुद्ध मूर्ति साकारण्यत आली. विशेष म्हणजे एका दिवसात त्यांनी मूर्तीची निर्मिती केली आहे.