शेखर इसापूरे
विभागीय प्रतिनिधी नागपूर
दखल न्यूज भारत
यवतमाळ :- येथिल महासम्राट बळीराजा सभागृहास उमरखेड महागावच्या शेतकऱ्यांनी भेट दिली .या प्रसंगी बळीराजा स्वराज्य सेनेचे संस्थापक अध्यक्ष ईंजि.नरेंद्र गद्रे यांनी सर्व शेतकरी बांधवांचे गुलाब पुष्प व बळीराजाची प्रतिमा देऊन स्वागत केले.
नरेंद्र गद्रे यांनी उपस्थितांना “रायगड” या भव्यदीव्य उभारण्यात आलेल्या वास्तुची व बळीराजा सभागृहाची माहीती दिली व बळीराजा स्वराज्य सेना एक गैरराजनैतिक संघटना असून या संघटनेची शेतकरी या वर्गाशी निगडित कार्याची माहीती दिली.
या प्रसंगी बळीराजा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब रास्ते शेतकरी कष्टकरी संघटनेचे सचिव बालाजी पाटील,कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड चे संचालक संतोष जाधव स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आध्यक्ष शिवानंद राठोड,पत्रकार सचिन उबाळे सविता चंद्रे शेतकरी गजानन सुरोशे,शुभम माने,ॲड.शिंदे आदी शेतकरी उपस्थित होते.