प्रकल्पग्रस्तांना न्याय यथाशिघ्र देण्याकरिता शासन कटिबद्ध :- ना.देवेंद्र फडणविस…

 

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

  विधानभवन नागपूर येथे विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा मोर्चा दि १४ डिसेंबरला धडकला.मोर्चाची सुरुवात दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडियम नागपूर येथून करुन विधानभवन येथे पोहचला. 

          या मोर्चा मध्ये अमरावती,वाशिम जिल्ह्यासह पश्चिम विदर्भातील लांबवरुन लेकराबाळासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते. मोर्चा मध्ये तिन हजार प्रकल्पग्रस्त शेतकरी महिला सह उपस्थित होते. 

          मोर्चा विधानभवन येथे धडकल्यानंतर समिती शिष्टमंडळ यांना विधानभवन मध्ये आमंत्रित केले. 

       शासनाने निवेदन स्विकारण्यास मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची नियुक्ती केली होती. समिती शिष्टमंडळाने यांनी अनिल पाटील यांचे सोबत विदर्भातील प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचेवर झालेल्या अन्यायाची सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. 

         यावेळी समिती शिष्टमंडळ यांनी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यासाठी आग्रह धरल्यामुळे विधानपरिषदेचे आमदार श्रीकांत भारतीय यांचे समवेत फडणवीस यांना निवेदन सादर करुन प्रदिर्घ चर्चा झाली. 

               यावेळी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले की, प्रकल्पग्रस्तांचा अहवाल मागवतो व लवकरात लवकर निर्णय देण्याचे आश्वासित केले. याप्रसंगी समिती शिष्टमंडळ मध्ये विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती संघर्ष समिती चे जेष्ठ मार्गदर्शक विधळे काका, समिती अध्यक्ष मनोज तायडे, समिती कार्याध्यक्ष माणिकराव गंगावणे, सचिव विजय दुर्गे, समिती संघटक सौ. मनिषाताई चक्रनारायण उपस्थित होते. 

        मोर्चास आमदार श्रीकांत देशपांडे, माजी मंत्री तथा आमदार यशोमतीताई ठाकूर, आमदार बळवंतराव वानखेडे, यांनी संबोधित करून सक्रिय मदतीचे आश्वासन दिले.

       मोर्चाचे नेतृत्व विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त समिती पदाधिकारी मनोज तायडे, माणिकराव गंगावणे, विजय दुर्गे, विकास राणे, शिवदास पाटील ताठे, हरिश्चंद्र जाधव यांनी केले.

      मोर्चामध्ये राजेन्द्र लोखंडे आणि संच यांनी प्रकल्पग्रस्तावर गिते सादर करुन चैतन्य निर्माण केले. मोर्चा शिस्तबद्ध व शांततेत पार पडला.