आई म्हटले की विश्लेषणातंर्गत अनेक शब्दांची विशेषणे…
पण,”आमची आई,श्रिमती ललिता देवानंद कऱ्हाडे म्हणजे जिव्हाळ्याचे व मैत्रीचे प्रेमळ घर व ऋणानुबंध जपण्याचे सखोल आदर मन..
अत्यंत बिकट व विपरीत परिस्थितीत माझ्या वडिलांना साथ देणारी कणखर आधारवड पत्नी..
ती हळवळ,मनमिळावू,शांत, सुसंस्कृत आहे,वेळप्रसंगी कठोर असली तरी संबंध जपणारा तिचा स्वभाव,मनाला नेहमी प्रसंन्न करणारा असतो.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर गंभीर समस्यांनी वेगवेगळी धक्कादायक परिस्थिती समोर आणली असताना सुद्धा तिने हिम्मतीने सर्व समजून घेत स्वतःसह इतरांना सांभाळण्यासाठी मन कधीच लहान केले नाही किंवा कुणाच्याही बाबतीत आजपर्यंत संकुचित भावनेंनी तिने कधीच विचार केलेला आठवत नाही,तद्वतच कुणाच्या विरोधात क्लेशदायक भावना मनात रुजू दिल्या नाहीत.
. आई सोबत आनंद व्यक्त करतानाचा क्षण.
संसाराचा गाडा ओढताना अनेक मोठमोठ्याल्या अळचणी आवासून पुढे ठकल्या असतांना दुःख आणि वेदनांना तिने कधीच समोर केले नाही आणि समस्यांनी बेजार झाली असताना ती कधीच थक्कली नाही व हरली नाही.
तिच्या मनमिळावू,शांत,स्वंयमी स्वभावाने कटूता शब्दांनाही बाजूला केले आहे.यामुळे आम्हाला सुध्दा वैरत्वाने न वागण्याचा सल्ला वेळोवेळी देत असते.
मात्र,अळचण निर्माण करणाऱ्यांपासून दूर राहण्याचे प्रासंगिक अनुभवही कथन करते.
आमची आई आम्हाला जिव्हापाड जपणारी असल्याने,” तिचा मनस्वी असा दैनंदिन आशिर्वाद,आमच्या सोबतीला नेहमीच असणार आहे.
आमची आई म्हणजे नित्याची सावली,आधार व प्रत्यक्ष अनुभवातील उतंम मार्गदर्शन..
“आज तिचा वाढदिवस आहे,आमची आई आमच्या सोबत दिर्घायुष्यभर रहावी अशी आमची मनस्वी तथा अंतःकरणपुर्वक ईच्छा आहे..
“आमची आई,आवश्यकते नुसार सावली व आधार देणारी असल्यामुळे,तिला आम्ही देण्याच्या लायकीचे अजूनतरी नाही!..
“आई,
तुझ्या वाढदिवसानिमित्त तुला चरणस्पर्श कोटी कोटी प्रणाम..
“आई आमच्यावर मायेची सावली नेहमी राहू दे!..
***
तुझीच लेकरे
दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे
वृत्त संपादीका
दखल न्यूज भारत वेब पोर्टल व युट्यूब चॅनल..
अमीत कऱ्हाडे
मुलगा
सौ.दिपा अमीत कऱ्हाडे
सुन
आणि….
चि.प्रतीक भैसारे, चि.आराध्य कऱ्हाडे, चि.श्राव्या कऱ्हाडे..
नातवंड…