उमेश कांबळे ता प्र भद्रावती
म्युनिशन इंडिया लिमिटेड पुणे यांच्या आदेशानुसार आयुध निर्माणी चांदा परिसरात विविध कार्यक्रमाद्वारे स्वच्छता पंधरवडा चे आयोजन करण्यात आले.
दिनांक १ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत चाललेला हा स्वच्छता पंधरवाडा महाप्रबंधक विजयकुमार यांच्या नेतृत्वात घेण्यात आला. यात आयुध निर्माणी अधिकारी, कर्मचारी, कामगार संघटना, जेसीएम सदस्य यांना स्वच्छतेविषयी शपथ देण्यात आली.
आयुध निर्माणी परिसरात उद्यान, मार्केट, वसाहत, मुख्य रस्ते, नाल्या यांची संपूर्ण सफाई करण्यात आली हा परिसर प्लास्टिक मुक्त झोन घोषीत करण्यात आला आहे, नागरिकांच्या स्वास्था विषयी जनजागृती करण्यात आली स्वच्छता पंधरवाड्यात विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, निबंध स्पर्धा, नृत्य, मॅरेथॉन दौड इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले . या संपूर्ण कार्यक्रमाची सांगता कम्युनिटी हाल येथे करण्यात आली. समारोपिय कार्यक्रमात विविध स्पर्धेत विजेत्या, उपविजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले यावेळी अप्पर महाप्रबंधक अशोक कुमार अग्रवाल, राकेश ओझा ,संजीव पाटील ,अभय एक्का , कार्यशाळा प्रबंधक विवेक वासनिक आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचालन प्रदीप राजुरकर यांनी केले