उमेश कांबळे ता प्र भद्रावती –
दर तीन वर्षांनी पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष पदासाठी होणारी अविरोध निवड पहिल्यांदाच लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन करण्यात आली. पोलिस पाटील जिल्हा अध्यक्ष पदासाठी तीन उमेदवार रिंगणात असताना अध्यक्षपदी योगेश रामदास मत्ते विजयी झाले.
पोलीस पाटील जिल्हा अध्यक्ष पदासाठी मतदान घेवून निवडणूक महाराष्ट्रात दुसऱ्यांदा चंद्रपूर जिल्ह्यात झाली तर पहिल्यांदा नांदेड येथे झाली होती. या पदासाठी तीन वर्षानंतर अविरोध निवड होत असते मात्र या प्रक्रियेत अध्यक्षपदाच्या उमेदवाराला विरोध दर्शविल्याने लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यातील ३४ पोलीस स्टेशन मधील अध्यक्ष व सचिव असे ६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला अध्यक्षपदाच्या निवडणुकीत योगेश मत्ते हे ३३ मते घेऊन विजयी झाले तर दुसऱ्या स्थानी नरेंद्र गहाणे तर तिसऱ्या स्थानी श्रीहरी कुबडे राहिले. ही निवडणूक प्रक्रिया जिल्हा पोलीस कल्याण बहुउद्देशीय सभागृह चंद्रपूर येथे पार पडली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे राज्यसचिव कमलाकर मांगले भृंगराज परशुरामकर यांनी काम पाहिले. जिल्हा अध्यक्ष विजयानंतर जिल्हा सचिव पदी विजय पादे, कोषाध्यक्ष सदाशिव वारे , कार्यकारी अध्यक्ष प्रवीण रामटेके, प्रसिद्धी प्रमुख गौतम बागेसर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे .