आमचे सरकार सर्वांचे संरक्षण करणार आणि सर्व समाज घटकातील युवकांना प्रशासकीय सेवेत समान भागीदारी देणार,महिलांना दरमहा ३ हजार तर बेरोजगार युवकांना ४ हजार देणार,महिलांना मोफत बस प्रवास तर शेतकऱ्यांचे ३ लाख रुपये कर्ज माफ करणार,जातिनिहाय जनगणना करणार.:- विरोधी पक्षनेते खा.राहुल गांधी.. — डॉ.सतीश वारजूकर व महाविकास आघाडी उमेदवारांच्या चिमूर येथील प्रचार सभेत विजयी जनसैलाब..

प्रदीप रामटेके/रामदास ठुसे

चिमूर वरुन…..

            विविध योजनांची घोषणा करीत महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचे,बेरोजगारांचे,विद्यार्थ्यांचे, शेतकऱ्यांचे,महिलांचे,मजूरांचे हित जपण्यासाठी,त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी,आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी,याचबरोबर भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित प्रचंड जनसमुदायस केले.

*****

डॉ.सतिश वारजूकरांना निवडून देण्याचे आवाहन…

           महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले की,राज्यातील सर्व नागरिकांचे संरक्षण करणार आणि महाराष्ट्र राज्यातील बेरोजगार तरुणांना अडीच लाख नौकऱ्या देणार,तद्वतच बेरोजगारांना प्रतिमहा ४ हजार देणार आणि महिलांना दर महा ३ हजार रुपये देणार असल्याचे जाहीर करून महाविकास आघाडीचे चिमूर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार डॉ.सतीश वारजूकर यांना निवडून देण्याचे आवाहन विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी उपस्थित प्रचंड महिलां भगिनिंना व मतदार बंधूंना केले.

******

३ लाख रुपयांचे कर्ज माफ करणार व शेतमालाला योग्य भाव देणार….

        याचबरोबर शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करणार असल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव देणार असल्याचेही ते बोलले.

*****

जि.एसटी लागू केल्यामुळे सर्वसामान्यांचे नुकसान झाले….

           खासदार राहुल गांधी पुढे म्हणाले की २५ भांडवलदारांचे १६ लाख करोड रुपयांची कर्जे नरेंद्र मोदी यांनी केले.मात्र शेतकऱ्यांचे त्यांनी कर्ज माफ केले नाही,यावरून भाजपा हा पक्ष भांडवलदारांच्या हिताचा असून शेतकऱ्यांचा विरोधक आहे असे त्यांनी उपस्थित मतदारांच्या लक्षात आणून दिले.

           याचबरोबर लहान व्यवसायिकांना,व देशातील नागरिकांना जि.एस.टी.लागू करून बरबाद केले असल्याचेही ते म्हणाले.

******

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे बहुसंख्य नागरिकांचे विरोधी….

             देशात २०० कंपन्या व्यावसायिकांच्या जगप्रसिद्ध असून त्या कंपन्यांचे मालक या देशातील ओबीसी,एससी,एसटी,व्हिजेंटी-एनटी, अल्पसंख्याक नाहीत.

        केवळ नरेंद्र मोदी यांचे ते २५ भांडवलदार माणसे आहेत.त्यांचे १६ लाख करोड रुपयांची कर्जे माफ करुन नरेंद्र मोदी हित जपतात,मनसंबंध जपतात,मात्र या देशातील नागरिकांचे हित जपण्यासाठी काहीही करीत नाही.हा त्यांचा दुजा भावच त्यांची कपट निती पुढे आणतो आहे हे सुद्धा त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

*****

९० अधिकारी आर्थिक बजेट तयार करतात,यात बहुजन समाजाला महत्त्वाचे स्थान नाही….

              ९० अधिकारी देशाच्या आर्थिक नितीचे नियोजन करतात व आर्थिक बजेटच्या माध्यमातून त्यांचे नियोजन सादर करतात.मात्र या अर्थमंत्रालयात ओबीसीचे ३ अधिकारी असून आदिवासींचा १ अधिकारी आहे.त्यांना वार्षिक आर्थिक बजेट तयार करताना सहभागी करून घेतले जात नाही.दूर बसण्यास सांगितले जाते हि वास्तविकता आहे.

       म्हणून या देशातील नागरिकांच्या हिताचे नियोजन केले जात नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे असेही खासदार राहुल गांधी म्हणाले.

*****

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच दिले…

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात सर्वांना समान अधिकार व हक्क दिले आहेत.सर्व सुविधा दिल्या आहेत,सर्वांचे सर्व प्रकारचे संरक्षण केले आहे.

        नागरिकांच्या आरोग्यावर विनामूल्य उपचार करणारी सुविधा,देशातील विद्यार्थ्यांची विनामूल्य शिक्षण व्यवस्था,रोजगार उपलब्ध करून देणारी हमी,नौकऱ्यांची संधी व हमी आणि समानता हे संविधानानेच दिले आहे.

        म्हणून संविधान वाचवण्यासाठी संघर्ष करणे आवश्यक आहे असे सुध्दा खासदार राहुल गांधी म्हणाले.

*****

इलेक्ट्रॉनिक मिडियाचा दुटप्पीपणा …

        शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असे मी बोलतो तर शेतकऱ्यांची आदत बिघडवित असल्याचे इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि प्रिंट मीडियाचे पत्रकार मला म्हणतात.

       परंतू भांडवलदारांचे १६ लाख हजार कोटी रुपयांचे कर्ज नरेंद्र मोदींनी माफ केले तर विकासाची पायाभरणी आहे असे हेच मिडिया वाले सांगतात.

        हा इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडियाचा दुटप्पी पणा येथील शेतकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा,मजूरांचा,बेरोजगारांचा शत्रू असून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आडकाठी निर्माण करणारा आहे असेही खासदार राहुल गांधी म्हणाले.

******

जातीनिहाय जनगणना करणार!..

      देशांतर्गत प्रत्येक क्षेत्रात देशातील ओबीसी,एससी,एसटी,व्हिजेंटी-एनटी,अल्पसंख्याक व इतर समाज बांधवांची भागिदारी सुनिश्चित करायची असेल तर जातिनिहाय जनगणना करणे आवश्यक आहे.

              महाराष्ट्र राज्यात व देशात जातिनिहाय जनगणना करुन त्यांच्या वास्तविक भागिदारीचे एक्सरे करणार असल्याचेही खासदार राहुल गांधी म्हणाले…

******

स्वास्थ विमा योजना….

        महाराष्ट्र राज्यातील नागरिकांचा २५ लाख रुपयांपर्यंतचा उपचार विनामूल्य करण्यासाठी,”स्वास्थ विमा योजना,लागू करण्यात येणार आहे व अमलात आणली जाणार आहे असे सांगून त्यांनी गोरगरीब जनतेला दिलासा दिला..

*****

१० लाख बेरोजगारांना रोजगार देणार,२ लाख ५० हजार नौकरभर्ती करणार!..

        महाराष्ट्र राज्यात बेरोजगारांची संख्या भरमसाठ असून टप्प्याटप्प्याने त्यांना रोजगार देणार व २ लाख ५० हजार बेरोजगार युवकांना नोकरी देणार अशी हमी त्यांनी दिली.

*****

महिलांना मोफत प्रवास…

        महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांना महाराष्ट्र राज्यात कुठेही परिभ्रमण करण्यासाठी विनामूल्य बस प्रवास सुरु करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले…

****

महालक्ष्मी योजना लागू,३ हजार रुपये दरमहा महिलांना देणार..

        राज्यात महालक्ष्मी योजना सुरू करुन महाराष्ट्र राज्यातील महिलांना दरमहा ३ हजार रुपये देण्यात येणार असल्याचेही ते बोलले…

*****

            देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचे पाऊल चिमूर क्रांतीभुमीत पडले आणि हात उंचावून त्यांचे जोरदार स्वागत चिमूर विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी केले.

           वेळ न गमावता त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात केली आणि विविध योजनांची माहिती देत त्यांनी देशातील महत्वपूर्ण घडामोडी बाबत वास्तविकता मतदारांच्या लक्षात आणून दिले.

           या सभेला केंद्रीय जनरल सेक्रेटरी के.सी.वेणुगोपाल,महाराष्ट्र प्रभारी चेन्नीथला,छतिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल,काँग्रेस केंद्रीय सचिव कुणाल चौधरी,केंद्रीय सचिव उषा गार,विधानसभा निरिक्षक अनवेश रेड्डी,बल्ला रेड्डी हे सुद्धा सभास्थळी उपस्थित होते.यापैकी बऱ्याच प्रमुखांनी सभेला संबोधित केले.

        सदर प्रचार सभेत उपस्थित जनसमुदायाला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार,चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेव किरसान,महाराष्ट्र राज्य सहप्रभारी चौधरीजी,रिपाइंचे राष्ट्रीय महासचिव डॉ.राजेंद्र गवई, आंबेडकरी चळवळीचे नेते अशोक रामटेके,माजी जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे चंद्रपूर जिल्हा सरचिटणीस,ओबीसी सेलचे महाराष्ट्र संघटक धनराज मुंगले,प्रसिध्द प्रबोधनकार अनुरुध्द वनकर आणि इतर मान्यवरांनी सभेला संबोधित केले.

           सभास्थळी माजी आमदार तथा खनिकर्म विकास महामंडळ अध्यक्ष डॉ.अविनाश वारजूकर,चिमूर विधानसभेचे उमेदवार डॉ.सतीश वारजूकर,बल्लारपूर विधानसभेचे उमेदवार संतोषसिंग रावत,हे सुद्धा सभास्थळी उपस्थित होते.

*****

     डॉ.सतिश वारजूकर यांचे मनोगत..

            चिमूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ.सतीश वारजूकर यांनी सभेला संबोधित करताना आमदार किर्तीकुमार भांगडियांच्या विकास कामांचे चौफेर आप्रेसन करीत विकास कामांची हवाच काढली.

          विधानसभा अंतर्गत रस्त्यांची कामे केल्याने विकास होत नाही तर विधानसभा क्षेत्रातील बेरोजगारांना,मजूरांना पुरेसा रोजगार व विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने,शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळवून दिल्याने,सिंचन सुविधा वेळेत शेतकऱ्यांना दिल्याने, विकास होत असतो असेही ते म्हणाले.

      याचबरोबर क्रीडांगण व बालाजी सागर यांच्या नावाने आलेला करोडो रुपयांचा निधी कुठे जातो हेच कळायला मार्ग नाही असेही ते म्हणाले.

        विद्यार्थ्यांसाठी आवश्यक शिक्षण सुविधा उपलब्ध करून देणार व आवश्यक रोजगार आणणार,ओबीसी,एससी,एसटी व्हिजेंटी-एनटी,अल्पसंख्याक व इतर समाजातील नागरिकांच्या हक्कासाठी लढणार,आंदोलन करणार आणि नागरिकांचे कार्यालयीन कामे वेळेत निकाली काढण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन डॉ‌.सतीश वारजूकरांनी उपस्थित मतदारांना दिले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रपूरचे पदाधिकारी विनोद दत्तात्रय यांनी केले तर आभार प्रदर्शन चिमूर तालुका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे यांनी केले.

          सभेतील प्रचंड जनसैलाब डॉ.सतीश वारजूकर यांच्या खात्रीपूर्वक विजयाचे संकेत देत होता..‌