आयरन लेडी’ सुश्री बहन मायावतींची पुण्यात महासभा… — विधानसभेच्या निकालानंतर बसपा ‘किंगमेकर’ ठरणार… — बसप महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यांचा दावा…

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे 

            वृत्त संपादिका 

पुणे, दि.१६ नोव्हेंबर २०२४

            देशातील बहुजनांचे आश्वासक नेतृत्व, बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री सुश्री बहन मायावतीजी उद्या, रविवारी (ता.१७) बसपा उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित करतील.

             पुरोगामी अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या पुण्यातील येरवडा परिसरात प्रादेशिक मनोरुग्णालय मैदान, ई कॉमर झोन येथे दुपारी १२ वाजता बहेनजींची जाहीर महासभा आयोजित करण्यात आली आहे.

               सभेत बहन मायावती यांच्या सह पक्षाचे राष्ट्रीय आकाश आनंद, राज्यसभा खासदार आणि केंद्रीय समन्वयक गौतम, केंद्रीय समन्वयक, महाराष्ट्र प्रभारी नर्मदाप्रसाद अहिरवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड.सुनील डोंगरे प्रामुख्याने उपस्थित राहतील.

           प्रदेश महासचिव काळुराम चौधरी प्रदेश सचिव सुदीप गायकवाड व पुणे जिल्हा प्रभारी मोहम्मद शफी देखील सभेत उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा अध्यक्ष दिलीप कुसाळे यांनी दिली.

           पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील कॅडर या सभेत लाखोंच्या संख्येत उपस्थित राहतील, अशी माहिती बसपा पदाधिकार्यांनी दिली आहे.

बसपा ठरेल बॅलेंसिंग पॉवर – डॉ.चलवादी

         राज्यातील २३७ मतदार संघात बसपा स्वबळावर, संपूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवत आहे. यंदा महाराष्ट्रात बसपाचं खात उघडेल. ‘बॅलेंसिंग पॉवर’ हाती ठेऊन बसपा निकालानंतर ‘किंगमेकर’च्या भूमिकेत दिसेल,असा विश्वास पक्षाचे महाराष्ट्र महासचिव डॉ.हुलगेश चलवादी यांनी व्यक्त केला.

          बसपा कुठलीही निवडणूक मतविभाजनासाठी नाही तर, जिंकण्यासाठी लढवते. निवडणुकीच्या काळात बसपा बद्दल अपप्रचार करणाऱ्या तथाकथित प्रसारमाध्यमांना निकालानंतर सडेतोड प्रत्यूत्तर मिळेल, असे डॉ.चलवादी म्हणाले.

            सत्तेत कुठलही युती-आघाडी आली तरी सर्वजनांच्या सुखाय करिता आवश्यक धोरण आखण्यासाठी त्यांच्यावर वचक ठेवण्याचे कार्य बसपाचे लोकप्रतिनिधी करतील, असे डॉ.चलवादी म्हणाले.