रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
काँग्रेस पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे चिमूर,ब्रम्हपुरी,वरोरा-भद्रावती, राजूरा,चंद्रपूर,बल्लारपूर,आरमोरी,गडचिरोली आणि अहेरी येथील महाविकास आघाडी व काँग्रेस पक्ष उमेदवारांच्या प्रचारार्थ चिमूरला येत आहेत.
चिमूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.सतीश वारजूकर,यांनी अख्या देशाचे लक्ष चिमूरकडे केंद्रीत केले असल्याने या मतदार संघाला देशात विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
चिमूर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत असून रुपयांनी स्वतःला बलाढ्य समजणाऱ्या भाजप आमदार किर्तीकुमार भांगडीया यांच्या सोबत त्यांची एकतर्फा लढत आहे.
मात्र,निवडणूक काळात मतदारांपुढे रुपये,व इतर धनशक्ती लोटांगण घालत असल्याने धनशक्ती इकडेतिकडे सैरावैरा पळू लागली असल्याचे चित्र आहे.
देशाचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांचा आज चिमूर येथील प्रचार दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.
ते प्रचार सभेला संबोधित करताना कोणकोणत्या मुद्द्यांना महत्व देतात याकडे चिमूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसह अख्या महाराष्ट्र राज्यातील मतदारांचे लक्ष लागले आहे.
खासदार राहुल गांधी हे विश्वसनीय नेते असल्याने त्यांच्या विचारांना जनता मनात घेत असल्याचे सर्वश्रुत आहे.
आज चिमूर येथे होणाऱ्या प्रचार सभानिमित्ताने मतदारांची प्रचंड उत्सुकता मोठ्या फरकाच्या विजयाची नांदी असेल..