धर्मरावबाबा आत्राम यांचे उपस्थितीत शेकडो युवकांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश…

ऋषी सहारे

   संपादक

आरमोरी- राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार व अन्न व औषध प्रशासन मंत्री नामदार धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर निष्ठा ठेऊन आरमोरी येथील सामाजिक कार्यकर्ते अनुज घोसे यांच्या नेतृत्वात शंभरावर युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

दिनांक १५नोव्हेंबर रोजी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम आरमोरी येथे आले असता सामाजिक कार्यकर्ते अनुज घोसे यांच्या नेतृत्वात आशुतोष भरणे, तुषार हलामी, सुमित वाडीकर, प्रथमेश कोडापे, वैभव सेलोकर, अंकुल मानकर, अमित जुआरे, तेजस नवघरे, फाल्गुन म्हैसकर, पवण कुकडकार, कुणाल उपथडे, संघर्ष रामटेके, वैभव धदंरे, अमर मानकर, अमण दुमाने, सुमित ठाकरे, सुहास कुकडकर ,विनय देविकार, प्रमय वलथरे, यश नेऊलकर, अनुज निबेंकर, गितेश सोनकुसरे, लुकेश सपाटे, अमोल टेकाम, सचिन कुथे, वैभव टेकाम व इतर युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.

    यावेळी मोहम्मद युनूस शेख माजी प्रदेश संघटन सचिव, लिलाधर भरडकर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस,अमिन लालानी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, सुनील नदंनवार कार्यकारी तालुकाध्यक्ष, प्रदीप हजारे कार्यकारी शहर अध्यक्ष, दिवाकर गराडे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस, धुरंधर सातपूते, अनिल आलबनकर, देवानंद बोरकर, योगेश थोराक, रविभाऊ दुमाने, दिपक बैस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.