प्रदीप रामटेके
मुख्य संपादक
मध्यप्रदेश राज्यामधील २३० विधानसभा मतदारसंघात तर छत्तीसगड राज्यामधील ७० विधानसभा मतदारसंघात उद्या मतदान होणार असून राजकीय हालचाली तेज झाल्या आहेत.
दोन्ही राज्यातंर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी सर्व प्रकारच्या घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहेत व मतदान प्रक्रिया दरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून सतर्क झाले आहेत.
मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये प्रचाराची राजकीय रणधुमाळी बऱ्यापैकी बघायला मिळाली असून मतदार मात्र आपले पत्ते खोलायला तयार नाहीत.यामुळे मतदारांच्या मनात नेमके काय दडले आहे हे सांगणे कठीण झाले आहे.
भाजपा व काँग्रेस पक्षाच्या द्वारा भ्रष्टाचारांबाबत केलेले आरोपपत्यारोप बघता मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील मतदार कुणाच्या बाजूने कौल देतील हे स्पष्ट नाही.
परंतु दोन्ही राज्यात काँग्रेस मजबूत स्थितीत असल्याचे गोपनीय सूत्रांची माहिती आहे.याचबरोबर मध्यप्रदेश आणि छत्तीसगढ मध्ये बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीची मतदार शक्ती मोठ्या प्रमाणात असून दोन्ही पक्षांचे उमेदवार बऱ्याच ठिकाणी पावर मोड मध्ये असल्याचे दिसून येते आहे.
मध्यप्रदेश व छत्तीसगड मध्ये बसपा व गोंडवाना गणतंत्र पार्टीची युती असल्याने दोन्ही पक्ष आपला राजकीय दबदबा शिध्द करण्यासाठी जिकरीने लढा देत आहेत.
उद्या सर्व राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीन मध्ये बंद होणार आहे.