चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी भंडारा
साकोली:-
येथील कृष्णमूरारी कटकवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राष्ट्रीय हरित सेनेअंतर्गत असलेल्या जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबतर्फे
प्रदूषणमुक्त पर्यावरणस्नेही दीपोत्सव संस्थाध्यक्ष विद्या कटकवार ,संस्थासचिव शिल्पा नशिने,सेवानिवृत्त मेजर कॅप्टन शिबानी ढोलकिया,बंगलोर येथील कार्यकारी अभियंता प्रखर नशिने,मुंबईचे मुख्य अंकेषक प्रणव ढोलकिया,प्राचार्य विजय देवगिरकर,शिक्षिका पुष्पा बोरकर,अनुराधा रणदिवे,प्रा.जागेश्वर तिडके यांच्या प्रमुख उपस्थितीत कटकवार विद्यालयात साजरा करण्यात आला.
यावेळी जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने यांनी पर्यावरणस्नेही प्रदूषणमुक्त दीपावली सण कसा साजरा करावा व त्याची आजच्या काळात का आवश्यकता आहे याची इत्यंभूत माहिती दिली.संस्थाध्यक्ष विद्या कटकवार यांनी समयोचित मार्गदर्शन करून दिपावली महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
यानंतर सर्वच प्रमुख अतिथींनी जयंत कटकवार ग्लोबल नेचर क्लबच्या सदस्य विद्यार्थ्यांनी तयार केलेले पर्यावरणस्नेही दीपावली संदेश देणारे आकाशकंदिल व पर्यावरण संदेशपर पणती सजावटीचे निरीक्षण करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
यावेळी सर्वच प्रमुख अतिथींनी फुलापानांनी सजविलेल्या दीपावली महोत्सवात ठेवलेल्या वृक्षांचेचे वृक्षपूजन करून व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पणती उजळून सर्वच परिसर ह्या आगळ्यावेगळ्या दिपावली कार्यक्रमाच्या प्रकाशाने तेजोमय करण्यात आल्या.
पर्यावरणस्नेही आकाशकंदील बनवा स्पर्धेत मिडलस्कुल गटात गुंजन घरतला प्रथम क्रमांक तर निधी निखारेला
द्वितीय क्रमांक व भुवी सपाटे, वृषाली चुटे,क्रिशा भांडारकर यांना तृतीय क्रमांक प्राप्त झाला.हायस्कुल गटात खुशी लसूंतेला प्रथम क्रमांक, प्रणय मेश्रामला द्वितीय तर कल्याणी भाजीपाले हिला तृतीय क्रमांक प्राप्त झाला तर कनिष्ठ महाविद्यालय गटात डिंपल पुरुषोत्तम बावणे हिला प्रथम क्रमांक प्राप्त झाला.प्रोत्साहनपर क्रमांक कोमल साखरे,अंश घोरमारे यांना तर उतेजनार्थ क्रमांक लिमांशी भाजीपाले,रश्मी कोरे, ओमेश्वरी वाढई,सानिया रामटेके, श्रुती बहावे, जान्हवी मेश्राम,ईशिका काळसर्पे, प्रांसी देशमुख, सलोनी देशमुख, आलिया टिकेकर,आश्विन रंगारी,संचित टेम्भुरने,नताशा बारापात्रे,ट्विनकल ठाकरे यांना देण्यात आला.स्पर्धेचे परीक्षण शिल्पा नशीने, शिबानी ढोलकिया,पुष्पा बोरकर, अनुराधा रणदिवे यांनी केले.
पर्यावरणस्नेही पणती सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कल्याणी भाजीपाले,ईशिका काळसर्पे व मनस्वी राऊत यांना द्वितीय क्रमांक हर्षिका उके,लिमांशी भाजीपाले, रश्मी कोरे,वैदेही दोनोडे, भार्गवी आंबेडारे ,यांना तर तृतीय क्रमांक दुर्वांशा चव्हाण,अंश घोरमारे, क्रित्तिका बोरकर,गुंजन घरत यांना प्राप्त झाले.प्रोत्साहनपर क्रमांक प्राप्ती कनपटे,धनश्री संग्रामे, श्रुती बहावे, कोमल भांडारकर, क्रिशा भांडारकर, भुवी सपाटे, जान्हवी धकाते, प्रिन्सि देशमुख यांना प्राप्त झाला.सहभागपर क्रमांक जान्हवी मेश्राम,सलोनी देशमुख, आलिया टिकेकर, प्रणय मेश्राम, अश्विन रंगारी,कोमल साखरे, निधी निखारे यांना प्राप्त झाला.स्पर्धेचे परीक्षण ग्लोबल नेचर क्लबचे संघटक प्रा.अशोक गायधने, अनुराधा घोरमारे,पुष्पा बोरकर, स्वयंसेवक युवराज बोबडे,रोशन बागडे, टिकेश्वरी हरणे,रुपाली निंबेकर, चेतना कापगते,दिपाली बनपूरकर, लिना कोहरे, लाकेश्वरी कोहरे,ज्ञानेश्वरी बारापात्रे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन बी एस लंजे तर प्रास्ताविक पुष्पा बोरकर तर आभार प्रदर्शन अनुराधा रणदिवे, नीलिमा गेडाम यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता पुष्पा बोरकर, अंजु घोरमारे मॅडम,प्रा.कृष्णा बिसेन, प्रा.जागेश्वर तिडके,प्रा.ज्ञानेश्वर लांजेवार,प्रा.राजेश भालेराव, प्रा.केशव कापगते,संजय भेंडारकर,हरिश्चंद्र सोनवाणे,निसर्गमित्र युवराज बोबडे,रोशन बागडे, टिकेश्वरी हरणे,मोहित बोरकर, दिपाली बनपूरकर, लीना कोहरे,लाकेश्वरी कोहरे, चेतना कापगते, ज्ञानेश्वरी बारापात्रे,रुपाली निंबेकर,प्रा.शितल साहू इत्यादी नेचर क्लबच्या सक्रिय सदस्यांनी तसेच इतर शिक्षक -शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.