डॉ. जगदिश वेन्नम 

    संपादक

गोंदिया:-पोलीस अधीक्षक गोंदिया निखिल पिंगळे, यांनी गोंदिया जिल्ह्यातील अवैध शस्त्र बाळगणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले त्यानुसार काल दिनांक १४/११/२०२२ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनी विजय शिंदे, पोलीस हवालदार राजू मिश्रा व पथक यांनी अवैद्य शस्त्र बाळगणारे इसमांचा शोध सुरू केला असता, पोलीस हवालदार राजू मिश्रा यांना निर्मल स्कूल जवळ रेलटोली गोंदिया येथे एक इसम बेकायदेशीर रित्या अवैध्य शस्त्रे बाळगून विकत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. सदर ठिकाणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वरील पथकाने छापा मारला असता इसम नामे – चमकोरसीग स्वर्णसिंग सिंग वय ५४ वर्ष, रा. क्लेजर उत्तर जिल्हा तामतरन (राज्य पंजाब) पोलीस थाना बिटावा यांनी लावलेल्या दुकानातील टेबलाचे खाली एका पांढ-या रंगाचे प्लास्टीक चे पोत्यात गुंडाळून ठेवलेल्या 15 तलवारी, 7 गुप्त्या, 7 चाकू अशी घातक हत्यारे मिळून आली. सदर इसमाकडे शस्त्र बाळगण्याबाबत कसलेही कागदपत्रे, परवाना नसल्याने तसेच मा. जिल्हाधिकारी सा. गोंदिया यांचे अधिसूचनेतील अटींचे उल्लंघन केल्याने अवैध शस्त्रे बाळगल्या प्रकरणी कारवाई करून सदर इसमा विरुद्ध पो.स्टे. रामनगर येथे *अपराध क्रमांक 263/22* भारतीय हत्यारे कायदा कलम ४,२५ अन्वये तसेच मुंबई पोलीस कायदा सन १९९१ कलम १३५ शिक्षा कलाम ३७(१)(३) चे उल्लंघन केल्याने रीतसर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

 

       सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री निखिल पिंगळे,यांचे निर्देशान्वये, अपर पोलीस अधीक्षक,श्री. अशोक बनकर यांचे आदेशान्वये स्था.गु.शा. प्रभारी पो.नि.श्री. बबन आव्हाड यांचे मार्गदर्शनात स्थागुशा चे पथक सपोनी. विजय शिंदे, यांचे नेतृत्वात पो.हवा. राजेंद्र मिश्रा/ ९१९ , पोहवा महेश मेहर/९५, पो.हवा. देखमुख / १२७७, पो. हवा. चित्तरंजन कोडापे / १२८३ यांनी कारवाई केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com