आदर्श ग्राम चंदनखेड़ा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा.

      उमेश कांबळे

तालुका प्रतिनिधी भद्रावती

       भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथे विविध कामाचा भूमिपूजन सोहळा खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडला. 

        तालुक्यातील चंदनखेडा गाव मोठे असून गावात आदिवासी समाजाची सर्वात मोठी लोकसंख्या आहे. सदर समाज बांधवाकरिता कोणतीही सामाजिक धार्मिक कार्यक्रम घेण्याकरिता सभा मंडप किंवा समाज भवन नसल्याने चंदनखेडा या गावचे सरपंच नयन जांभुळे यांनी प्रतिभा धानोरकर खासदार यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्याने या बाबीची दखल घेऊन मौजा चंदनखेडा येथे आपल्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी समाज सभागृहचे बांधकाम मंजूर करून दिनांक 15 ऑक्टोबर 2024 रोजी भूमिपूजन सोहळा पार पडला.

          यावेळी या गावचे सरपंच नयन जांभुळे तसेच उपसरपंच सौ.भारतीताई उरकांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण काकळे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रशांत काळे सुधीर मुडेवार, अनिल चौधरी, सुमित मुडेवार, बंडू कारमेंगे, ईश्वर धांडे तसेच ग्रामपंचायत सदस्य मुक्ता सोनुले, बंडू निखाते, सौ रंजना हनवते, प्रतिभा दोहतरे, सौ श्वेता भोयर, सविता गायकवाड, नाना बगळे, निकेश भागवत, सौ आशा नन्नवरे तसेच गावातील समाज बांधव माधव ननावरे, विकास नन्नावरे, सुशिलाबाई हनवते, दशरथजी भरडे , तसेच ग्राम काँग्रेस कमिटीचे सदस्य प्रशांत काळे, रवींद्र मेश्राम तसेच इतर ग्रामवासी उपस्थित होते.