मुख्यमंत्री पदाची खदखद केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा द्वारे अखेर बाहेर पडली… — मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना आपल्या फायद्यासाठी भाजपा झेलत होती काय? — नव्हे,तर उलटेच झाले…. — भाजपाला मुख्यमंत्री नव्हे तर सत्ता हवीय…

प्रदीप रामटेके 

 मुख्य संपादक

           केंद्र सरकार द्वारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठ्या प्रमाणात सन्मान केला जातोय.त्यांचे केंद्रिय सत्तेत खुप महत्व आहे व वजन वाढलेले आहे असे इलेक्ट्रॉनिक मिडिया द्वारा लोकांच्या मनात खूप पेरले जायचे.

        मात्र,महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या जागा वाटवापरुन वाद चिघळल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा द्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपाच्या त्यागाची आठवण करून दिली व आपल्या हद्दीत रहा असे त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना सार्वजनिक रित्या ठणकावून सांगितले.

           आता प्रश्न हा पडतो की,महाराष्ट्र राज्याची सत्ता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिपत्यातंर्गत आपल्या नियंत्रणात ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबत फुकटचे गोडवे गायचे व कामापुरता त्यांना मान द्यायचा असेच भाजपाचे उदिष्ट होते हे केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांच्या बोलण्यातून व्यक्त झाले असे म्हणता येईल…

         तसेही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच महाराष्ट्र राज्याची एकहाती सत्ता होती हे उघड होते.त्यांच्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे पान हलत नव्हते.मग भाजपाचा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यात असण्याची गरजच काय होती.

           मुख्यमंत्री पदासाठी आम्ही त्याग केलाय हे आडमार्गाने केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा यांनी महाराष्ट्राच्या मतदारांना सांगणे म्हणजे भाजपाचा एकप्रकारे प्रचारच करणे होय.

         भाजपाने मुख्यमंत्री पदासाठी त्याग करण्याचा उद्देश नव्हता,”तर,एकसंघ शिवसेना पक्षाला व एकसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला फोडणे व ४०० खासदार मिशनसाठी या दोन्ही पक्षाची लोकशक्ती महाराष्ट्र राज्यात कमी करणे हा शुद्ध हेतू त्यांचा होता.

            मात्र,लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील मतदारांनी,”भाजपाच्या महायुतीला नाकारुन ४०० खासदार मिशनच्या उद्देशाचे स्वप्न चकणाचूर केले.”आणि,”महाविकास आघाडीच्या,उमेदवारांना पसंती देत त्यांचे जास्त खासदार निवडून दिले व लोकसभेत पाठविले…

        भाजपाला कळले की, महाराष्ट्र राज्यात दोन पक्ष फोडाफोडीचे परिणाम लोकसभा निवडणूकीच्या वेळी विरोधात गेले,”तेव्हा,त्यांनी,”मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना,घाईघाईने अमलात आणली.आणि या योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी जिवाचे रान करणे त्यांनी सुरू केले.

          भांडवलदारांच्या हितसंबंधी सर्व प्रकारचे निर्णय घेताना,देशातील नागरिकांच्या विरोधात,देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात,देशातील विद्यार्थ्यांच्या विरोधात,देशातील मजूरांच्या विरोधात, देशातील महिलांच्या विरोधात,देशातील ओबीसी,एससी,एसटी, अल्पसंख्याक,व्हिजेंटी-एन्टी समाज घटकातील नागरिकांच्या विरोधात घेतले निर्णय महाराष्ट्र राज्यातील जनता एवढ्या लवकर भुलेले असावेत असे भाजपाला वाटते आहे.

          पण,हा महाराष्ट्र राज्य आहे आणि महाराष्ट्र राज्यातील मतदार विचारपूर्वक मतदान करतात.केंद्रीय गृहमंत्र्यांना प्रश्न आहे की,भावनिक विचारांना कुठपर्यंत महाराष्ट्र राज्यातील मतदार बळी पडतील? 

     भाजपाला मुख्यमंत्री नाही तर कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र राज्याची सत्ता पाहिजे आहे.म्हणूनच मतदारांत संभ्रमावस्था निर्माण करणारे मुद्दे भाजपा पुढे आणेल एवढे निश्चित..

        उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच महाराष्ट्र राज्याच्या सत्तेची सर्व जबाबदारी असतांना भाजपाने मुख्यमंत्री पदाचा त्याग केला म्हणणे म्हणजे हशास्पद बाब नाही काय?