आता उमेदवारांकडे लक्ष… — पक्षांचा लेखाजोखा…

प्रदीप रामटेके 

  मुख्य संपादक 

      महाराष्ट्र व झारखंड राज्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे आता मतदारांचे उमेदवारांकडे लक्ष लागले आहे.

       महाराष्ट्र राज्यांतर्गत बऱ्याच विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय आणि राज्य मान्यता पक्षांचे बरेच जुने चेहरे उमेदवार म्हणून असतील तर नवीन उमेदवारांना सुध्दा सदर पक्ष संधी देतील.

           राष्ट्रीय काँग्रेस पक्ष,भाजपा,बसपा,शिवसेना (उबाठा),राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार), शिवसेना (शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजीत दादा पवार),व माकपा,भाकपा,शेतकरी कामगार पक्ष,वंचित बहुजन आघाडी,समाजवादी पक्ष,समादवादी आजाद पक्ष,रिपाई,प्रहार पक्ष आणि अपक्षांसह इतर पक्षाचे उमेदवार महाराष्ट्र राज्यातील विधानसभेच्या निवडणुक मैदानात असतील.

      मात्र,महाविकास आघाडी व महायुती यांच्यातच खरी लढत रंगणार आहे.तद्वतच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार दमदारपणे निवडणूक मैदानात उतरणार असल्याने अनेक विधानसभा मतदारसंघात तिहेरी व बहुरंगी लढत बघायला मिळणार आहे.

          याचबरोबर महायुतीच्या मंत्र्यांना व आमदारांना नागरिक(मतदार) कंटाळले असाल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जमेची बाजू असणार आहे.

            वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.प्रकाश आंबेडकरांचे वास्तवातील खरे वक्तव्य नागरिकांना रुचत नसल्याने त्यांच्या पक्षाला विधानसभेत दमाने उतरावे लागणार आहे.

       बहुजन समाज पार्टीने एकेकाळी महाराष्ट्र राज्यात दबदबा निर्माण केला होता व मतदारांच्या मनात घर निर्माण केले होते.मात्र मान्यवर कांशीराम साहेबांच्या महामृत्यू नंतर हा पक्ष महाराष्ट्र राज्यात कमालीचा मागे पडला आहे.परंतू राजकारणात बदल होवू शकतात हे सुध्दा नाकारता येत नाही.

       तद्वतच प्रहार,रिपाई,भाकव,माकप, शेतकरी कामगार पक्ष, समाजवादी पक्ष,आणि नवीन पक्षांची मतदारांवर पाहिजे त्या प्रमाणात पकड नसल्याने ते महाराष्ट्राच्या राजकारणात प्रभाव पाडणार नाही.मात्र काही मतदार संघात त्यांचा प्रभाव असल्याचे वास्तव आहे.

          राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना(उबाठा),राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(शरदचंद्र पवार) यांच्या महाविकास आघाडी विरुद्ध सत्ता पक्षांतर्गत भाजपा, शिवसेना (शिंदे गट),राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष(अजीत दादा पवार, यांच्या महायुतीच्या प्रचारा नुसार मतदार निर्णय घेणार असून आपला कौल देणार आहेत.

        मात्र,महाविकास आघाडीचे काही उमेदवार सहज निवडून येणार आहेत.त्यांच्या विजयासाठी महाराष्ट्र राज्य सत्ताधाऱ्यांनीच त्यांच्या अयोग्य धोरणान्वये मार्ग मोकळे करून ठेवले आहेत.