महापुरुषांचे पदस्पर्श अन जगाच्या इतिहासात चंद्रपूर…. — धम्म दिक्षा सोहळा केवळ वैचारिक क्रांती नव्हे तर माणसांना घडविणारी व जोडणारी जगमान्य प्रखर दूरदृष्टी.. — देशातील बहुजन समाजासह सर्व समाज ताठ मानेने जगतो तो,”युगप्रवर्तक,प्रकांड पंडित,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांमुळेच…

 

संपादकीय 

प्रदीप रामटेके 

मुख्य संपादक 

            भारतीय घटनेचे शिल्पकार तथा जगविख्यात समाज सुधारक डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हटले की या देशातील समस्त नागरिकांचे तारणहार आणि जगाच्या इतिहासातील अनेक इतिहासिक घटनांचे प्रत्यक्षदर्शी दर्शन!..

         अशा या जगविख्यात महामानवांचे सन १६ आक्टोंबर १९५६ ला बौद्ध धम्म दिक्षा सोहळ्याच्या अनुषंगाने चंद्रपूर नगरीत पदस्पर्श झाले अन चंद्रपूर शहर जगाच्या इतिहासात नोंदविल्या गेले.

           भारत देशात क्रांतिकारक झालेत.संतही झालेत,महात्मा आणि स्वातंत्र्य विरांसह,समाजसुधारकही होवून गेलेत.या सर्व विभूतींचे महंतम कार्य आपापल्या परिने समाजहितासह देशहिताचे ठरले.

            “पण,देशातील सर्व समाजातंर्गत वंचित,पिडित,शोषीत,अन्यायग्रस्त व अत्याचारग्रस्त नागरिकांना,महिलांना,तरुण,तरुणींना,शेतकऱ्यांना,मजूरांना,कर्मचाऱ्यांना,विद्यार्थ्यांना,विद्यार्थ्यिनींना,स्वाविभानातंर्गत सन्मानजनक ताठ मानेने जगता यावे यासाठी त्यांच्या सर्व प्रकारच्या हक्कासाठी शेवटच्या श्वासापर्यंत न्यायीक आणि योग्य संघर्ष करणारे प्रकांड पंडित-युगप्रवर्तक-युगपुरुष-बोधिसत्व-महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे जगाच्या इतिहासात युगानुयुगे अजरामर विजयी व यशस्वी धम्मचक्र पर्वतक,भारतीय घटनेचे शिल्पकार आणि समाजसुधारक ठरलेत.

            चंद्रपूर येथील धम्मदिक्षा सोहळा म्हणजे देशातील अनेक इतिहासिक घटनांपैकी एक.च्ंद्रपूर धम्मदिक्षा सोहळ्यात विचारांची पेरनी करतांना अशा विचारांची पेरनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केली की त्या विचारसरणीला मुरवता येत नाही आणि त्या विचारसरणीच्या बिजालाही खोदून फेकता येत नाही..

          “चारित्र्य संपन्न समाज घडविल्या शिवाय देशाचे चारित्र्य उत्तम आणि मजबूत असू शकत नाही,हे युगपुरुष डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी अचूक ओळखले होते.

           तद्वतच चारित्र्य संपन्न समाज प्रथमतः स्वतःला ओळखतो व न्यायसंगत बनतो यावर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अघाड विश्वास होता.

          अर्थात असा समाज एकमेकांना दूर लोटत नाही,एकमेकांच्या बाबतीत द्वेष पसरवित नाही,एकमेकांचा तिरस्कार करीत नाही,कुणावरही अन्याय व अत्याचार करीत नाही,कुणाचेही शोषण करीत नाही,कुणाचा अपमान होईल असी कृती करीत नाही,कुणाकडेही उच्चनीचतेच्या तुच्छ भावनांनी बघत नाही,कुणाचेही हक्क हिरावून घेवू शकत नाही,कुणालाही मानसिक व वैचारिक गुलाम करीत नाही,कुणाच्याही हक्कावर गदा आणीत नाही,कुणाच्याही हक्कावर आक्रमण करीत नाही,एकमेकांच्या बद्दल धोकादायक परिस्थिती निर्माण करीत नाही,याबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी चारित्र्य संपन्नतेची स्पष्टता ओळखली होती.

           म्हणूनच या देशातील सर्व नागरिकांना मताधिकार मिळवून देताना सदैव त्यांच्या हिताचे कार्य व काम करणारे त्यांनी लोकप्रतिनिधी म्हणजे खासदार व आमदार निवडून आणले पाहिजे आणि स्वतःच्या समाज घटकातील नेतृत्व सातत्याने गतिशील ठेवले पाहिजे असा डोळस-समजदार-जागरुक-सतर्क मतदार त्यांना अपेक्षित होता व आहे.

            तद्वतच प्रलोभनाच्या नादात लागून स्वतःसह स्वतःच्या समाजाला लाचार व कमजोर करणारे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रकांड पंडित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अजिबात मान्य नव्हते आणि नाही.

             स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ति स्वतंत्र्य यात फरक आहे हे भारत देशातील नागरिकांना,महिलांना,तरुणांना,तरुणींना,विद्यार्थी व विद्यार्थीनींना,मजूरांना,कर्मचाऱ्यांना,राजकीय पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांना,सामाजिक संघटना पदाधिकारी व कार्यकर्त्यांना अजून पर्यंत बरोबर कळलेले दिसत नाही.याचबरोबर त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव सुद्धा आजपर्यंत झालेली दिसत नाही.

  (काहींना सोडून)

           याला कारण एकच आहे,देशातील तमाम भारतीयांना संविधानाच्या संकल्पनातंर्गत कर्तव्य जाणीवे नुसार दूर ठेवणे होय.

              संविधानाच्या परिभाषा अन्वये देशातील सर्व जनतेला त्यांचे हक्क त्यांना कळाले नाही तर पिढ्यानपिढ्या दरपिढ्या त्यांना मुर्ख बनविले जावू शकते व त्यांचे शोषण केले जावू शकते हे धुर्त सत्ताधाऱ्यांनी ओळखले आहे.

             यामुळे स्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा फरक देशातील नागरिकांना अजून पर्यंत कळू दिला नाही,अशा प्रकारची देशातील राजकारण्यांची कुटनिती व षडयंत्र पुर्वक कार्यपद्धत देशातील नागरिकांना परावलंबी बनवू लागली,लाचार करु लागली…

            परावलंबी व लाचार समाज हा बिनडोक बनतो,माना हलवनारा शक्तीहिन आणि दुर्बल ठरतो हे बहुजन समाजातील नागरिक ओळखण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.यामुळे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला सत्ताधाऱ्यांकडून धोके निर्माण होऊ लागले आहेत.

**

मुळ मुद्दा…

         १४ ऑक्टोबर १९५६ चा नागपरचा बौद्ध धर्म धम्मदिक्षा गतीमान सोहळा असो की १६ आक्टोंबर १९५६ चा चंद्रपूर येथील बौद्ध धर्म धम्मदिक्षा सोहळा असो,”तो शोहळा म्हणजे,केवळ वैचारिक क्रांती नव्हती तर माणसांना घडविणारी व जोडणारी जगमान्य प्रखर दूरदृष्टी होती हे लक्षात येते.

           कारण तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म जगात एकमेव असा आहे की प्रत्येक व्यक्तींच्या चारित्र्य संपन्नतेची परिसंकल्पना स्वयंशिध्द करतो व त्यानुसार उत्तम आणि योग्य आचरण कार्यपद्धतीची जाणिव प्रत्येक नागरिकांना करुन देतोय.

            मनुष्यमात्रांच्या आयुष्यात प्रारंभापासून ते शेवट पर्यंत शिल संकल्पने नुसार कार्यपद्धत जगाच्या पाठीवर बौद्ध धम्मा शिवाय कुठल्याच धर्मात आढळून येत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

         म्हणूनच स्वतः बुध्दमय झाल्यावर बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील नागरिक सातत्याने बौध्द धंम्माकडे त्यांच्या सदैव कल्याणासाठी वळायलाच पाहिजे हा दुरदृष्टीकोन लक्षात घेत नागपूर व चंद्रपूर येथे बौध्द धम्माची दीक्षा लाखो नागरिकांना दिली होती हे त्यांच्या सर्वोतंम इतिहासीक कर्तव्यातंर्गत अदभुत अशा धम्म परिवर्तन क्रांतीतून दिसून येते..

            कारण तथागत भगवान बुध्दांच्या धंम्मात,”भेदभाव कुटनितीला,गुलाम करणाऱ्या विकृतीला,लाचार बनवणाऱ्या अहंकाराला,परावलंबी आयुष्य ठेवू इच्छिणाऱ्या मनोवृत्तीला,उच्चनीचतेच्या भावार्थाला,असमानता,द्वेष,कटूता,तिरस्कारपणा,चुगलचोटेपणा,अन्याय व अत्याचार करण्याऱ्या कृतीला,शोषणयुक्त मानसिकतेला अजिबात थारा नाही.

             तर बौध्द धम्मात मैत्रीभाव आहे,समभाव आहे,चारित्र्य संपन्नभाव आहे,न्याय भाव आहे,सदाचार भाव आहे,बंधुत्व भाव आहे,स्वातंत्र्य भाव आहे.यामुळेच तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा देशातील व जगातील नागरिकांना माणूस म्हणून घडविणारा व मानविय दृष्टीकोन विचार शक्ती द्वारा एकमेकांना जोडणारा सरळ व सोपा जगमान्य धम्म (धर्म) आहे.

***

ताठ मानेने जगणारा समाज…

        महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महान कर्तव्य व विशाल असे सर्वोत्तम कार्य हे भारत देशातील नागरिकांच्या मान सन्मानासाठी,स्वातंत्र्यासाठी व अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठीच आहेत.

            स्वातंत्र्य म्हणजे दुसऱ्याच्या तावडीतून मुक्त करणारी बदल व्यवस्था होय किंवा इतिहासिक लढाई होय व इतिहासिक संघर्ष होय..”तर,अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे जिवन जगण्याची उत्तम व सर्वोत्तम कायदेशीर मोकळीकता होय.

               देशातील नागरिकांना कायदेशीर असे मानसन्मानाचे उत्तम व सर्वोत्तम जिवन जगता यावे यासाठी युगप्रवर्तक डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशात महान असी जगविख्यात इतिहासिक धार्मिक,समाजिक व राजकीय क्रांती घडवून आणली.

            आणि भारतीय संविधानाच्या माध्यमातून देशातील सर्व नागरिकांना कायदेशीर असे समान अधिकार बहाल केलीत.

         भाषण देण्याचा व मत व्यक्त करण्याचा अधिकार,लिहिण्याचा अधिकार,मताचा अधिकार,व्यवसाय करण्याचा अधिकार,आरोग्याचा व स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार,खासदार-आमदार,कुठल्याही क्षेत्रातील सदस्य बनन्याचा अधिकार,कर्मचारी व अधिकारी होण्याचा अधिकार,गरिबांना घरे देण्याचा व ते उपवासी राहू नये म्हणून अन्नाचा अधिकार,शिक्षणाचा अधिकार,स्त्रियांना हिंदू कोडबिल अन्वये सर्व क्षेत्रात समान अधिकार,शेतकऱ्यांना सर्व प्रकारच्या सोयी व सुविधांचा अधिकार आणि सर्व प्रकारचे हक्क भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व जनतेला दिले आहेत.

         म्हणूनच भारत देशातील सर्व नागरिक आजच्या स्थितीत ताठ मानेने सन्मानपूर्वक जगतो आहे.