सुधाकर दुधे
सावली तालुका प्रतिनिधी
9404105696
धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधुन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समिती सावली च्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रम समाज मंदिर च्या प्रांगणात घेण्यात आले.यात दि 12 आक्टोंबर ला.महाकारुनिक तथागत बुध्द व घटनेचे शिल्पकार डा बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प हार व दिप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली..
…तीन दिवसीय या कार्यक्रमात.रांगोळी स्पर्धा, मेणबत्ती स्पर्धा, हंडीफोड स्पर्धा, एकल नृत्य, समुह नृत्य(युवा वर्गासाठी) ,समुह नृत्य (महिला) ,भाषण स्पर्धा,भिम बुध्द गीत गायन आदी स्पर्धा घेण्यात आल्या.तसेच दैनिक सकाळ मधील दिक्षा विशेषांकचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले
विविध स्पर्धा मध्ये स्पर्धकांनी भाग घेऊन बक्षीस मिळविली,बक्षीस वितरण कार्यक्रम 14 ऑक्टोबर ला पार पडला.तसेच पार पडलेल्या तीन दिवसीय विविध कार्यक्रमात परीक्षक म्हणून दिपंकर रायपुरे व सौ चंदाताई सुभाष गेडाम यांनी मोलाचे सहकार्य केले
यावेळी मंचावर डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह अस्थाई समितीचे अध्यक्ष प्रीतम गेडाम सह समितीचे पदाधिकारी व सदस्य यांनी तीन दिवसीय कार्यक्रमाला सहकार्य केले
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाबा मेश्राम तर आभार प्रितम गेडाम यांनी मानले.