धानोरा /भाविक करमनकर 

          धानोरा एक सशक्त आणि एकजूट समाज निर्मिती साठी संघ शक्ती गरजेची आहे.समाज संघटित असेल तर समाजहिताच्या गोष्टी घडू शकतात आणि म्हणून समाज संघटना गरजेची आहे असे प्रतिपादन प्रमोदजी चिंतलवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धानोरा तालुका विजया दशमी उत्सवात स्वयंसेवकांना उद्बोधन दिले.सजन शक्तीचा संघटन समाजात चांगले कार्य आणि बदल घडवून आणू शकतात.आणि संघटित हिंदू समाज सशक्त समाजाचा आधार होऊ शकतो असेही त्यांनी आपल्या उद्बोधनात सांगितले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशभरात बरेच समजोपयोगी सेवाकार्य चालत असतात समाजात सक्रिय कार्यकर्ते आणि सजन शक्ती निर्माण करण्याचे काम संघाच्या शाखेत होत असते.वर्षभरात एकूण 6 उत्सव संघातर्फे साजरे केले जातात त्यात विजयादशमी हा उत्सव विजया दशमी पासून 20 ते 25 दिवस पर्यंत साजरा केला जातो.व यात आपल्याकडे असलेल्या शस्त्रांचा पूजन केला जातो.अशाच प्रकारे धानोरा तालुक्याचा विजया दशमी उत्सव 15/10/2022 ला किसाण भवन धानोरा येथे पार पडला.या मध्ये धानोरा येथील किसान भवन ते बाजार चौकातून पथ संचलन काढण्यात आले.आणि पाहुण्या कर्वी परमपवित्र भगवा ध्वज,आणि प्रतिमांचे पूजन करून व शस्त्र पूजन करून उत्सवाची सुरवात करण्यात आली.या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी राखडे महाराज वि.ही.प.धर्माचार्य धानोरा , प्रमुख वक्ते प्रमोदजी चिंतलवार होते.कार्यक्रमात विकासभाऊ वडेट्टीवार(जिल्हा सहकार्यवाह),पवनजी डहारे (जिल्हा प्रचारक गडचिरोली जिल्हा) जनार्धन जी कठाने (तालुका कार्यवाह) चेतन मोहूर्ले,संघाच्या माध्यमातून चालणाऱ्या एकल विद्यालयाचे सर्व शिक्षक-शिक्षिका-पर्यवेक्षक आणि धानोरा नगरातील स्वयंसेवक उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकेश उईके,अंकुश मंगाम यांनी हातभार लावला.यामध्ये शुभाषित उमेश कुमार मडावी,अमृत वचन तुषार कोकोडे,वैयक्तिक गीत आशिष उईके आणि सांघिक गीत जनार्धन कठाने यांनी घेतला.शेवटी प्रार्थना घेऊन उत्सवाचा समापन करण्यात आला.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com