प्रतिनिधी//प्रलय सहारे

 

वैरागड : – येथील गावातील चौकमधील मुख्य रस्त्याने असलेल्या श्री कृष्ण कापड दुकान, हर्षे ज्वेलर्स आणि ओम साई ज्वेलर्स या तीन दुकानावर दि. 16 ऑक्टो. रोजी मध्यरात्री चोरट्यांनी हमाला करून दुकान फोडण्याचे प्रयत्न केले. यात चोरट्यांना श्री कृष्ण कापड दुकान येथे चोरी करण्यात यश मिळाले. याबाबत आरमोरी पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

चोरटे चारचाकी वाहनाने (कार) गावातील मुख्य रस्त्यापासून बस स्थानक समोर गांधी चौकातील सुभाष हर्षे मालक असलेली हर्षे ज्वेलर्स येथे मध्यरात्री ०२ च्या सुमारास दुकानाचे शटर कटर आणि सब्बलीने फोडण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु समोरून मोटासायकलस्वार येत असल्याने त्याला पाहून चोरट्यांनी पळ काढला. शटर तोडीत असतांना चोरट्यांनी दोन सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बंद केले परंतु एक सी.सी. टी. व्ही. कॅमेरा सुरू असल्याने चोरटे कॅमेरा बंद झाले. यात पाच चोरटे असल्याचे दिसते.

त्यानंतर चोरटे परत मार्गी असलेल्या मध्यरात्री ०२::३० च्या दरम्यान दतात्रय हर्षे मालक असलेल्या ओम साई ज्वेलर्स या दुकानाचे शटर फोडण्याचे प्रयत्न केले. परंतु फोडण्याचे आवाज ऐकून दुकान समोर असलेले शरद डुंबरे गुरूजी यांना जाग आली. त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता चार चोरटे सब्बलीने दोन शटर काढत असल्याचे दिसले. शरद डुंबरे यांनी त्यांना विचारणा केली असता पोलिस अहो अशी बतावणी करून समोर पळाले. ही सर्व बाब सी.सी. टी. व्ही. कॅमेरेत बंद झाली. त्यानंतर सकाळी तीनच्या सुमारास बस स्थानक जवळील संजय नंदनवार मालक असलेले श्री कृष्ण कापड दुकानाचे चोरटे दोन शटर फोडून आत प्रवेश केले. यात त्यांचे चिल्लर आणि नोट पकडून ७५,०००/- (पंचातर हजार) रू. तसेच दुकानातील कापडाचे गठ्ठे २,०००००/- (दोन लाख) रू. असे एकूण २,७५,०००/- (दोन लाख पंचातर हजार ) रुपयाची चोरी झाल्याचे तक्रारीत नोंद करण्यात आले. दुकानातील सी.सी. टी. व्ही. कॅमेरे बंद असल्याने चोरट्यांची माहिती मिळू शकले नाही.

 

याबाबत आरमोरी पोलिसांना माहिती मिळताच सकाळीच घटनास्थळी रवाना झाले. पोलिसांनी तीनही दुकानाची पाहणी करून माहिती घेतली त्यानंतर ज्या ठिकाणी सी.सी. टी. व्ही. कॅमेरे आहेत तेथची पाहणी करून चोरट्यांचा सुगावा लावण्याचा प्रयत्न आरमोरी पोलिस विभाग करीत आहेत. 

 

आरमोरी पोलिस ठाण्याचे पोलिस ठाणेदार मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उप निरीक्षक झिंगझुरडे, पोलिस सहाय्यक निरीक्षक चौके आणि हवालदार नरेंद्र बांबोळे पुढील तपास करीत आहेत. झालेल्या घटनेमुळे गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी चोरांना पकडून जेरबंद करावे अशी मागणी यावेळी येथील नागरिक करीत आहेत.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com