अश्विन बोदेले 

तालुका प्रतिनिधी 

दखल न्यूज भारत

 

आरमोरी :- “बहुजनो शासक बनो” अभियानांतर्गत बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा द्वारा विशाल जन आंदोलन तथा कार्यकर्ता संमेलन दिनांक 15 ऑक्टोबर 2022 ला आयोजित केला होता. तथा बामसेफ,डी .एस .फोर ,बसपाचे संस्थापक, बहुजन नायक मान्यवर साहब कांशीराम जी यांचे महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा द्वारा , जिल्हा प्रभारी प्रदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात आरमोरी तहसील कार्यालयावर बहुजन समाज पार्टीचा विशाल धडक मोर्चा धडकला.

सर्वप्रथम प्रदीप खोब्रागडे यांच्या नेतृत्वात वैरागड ते आरमोरी रॅली काढून आरमोरी येथील बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करून रॅली काढत मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला.

यावेळी महापुरुषांच्या जयघोषात व विविध नाऱ्याच्या जयघोषात संपूर्ण आरमोरी नगरी दुमदुमली. व विविध मागण्यांच्या निवेदनाच्या प्रती मा. तहसीलदार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.

यामध्ये प्रामुख्याने ओबीसींची जनगणना झाली पाहिजे, व शिक्षण नोकरी राजकारणात 52 टक्के आरक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, आदिवासींना शासन निर्णयाप्रमाणे जमिनीचे पट्टे मिळालेच पाहिजे, खाजगीकरण बंद करून सुशिक्षित बेरोजगारांना त्वरित नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, आमदार खासदारांचे पेन्शन बंद झालेच पाहिजे, जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे , बहुजनावर होत असलेला अन्याय अत्याचार थांबलाच पाहिजे, वृद्धांना पाच हजार रुपये मासिक पेन्शन मिळालाच पाहिजे , शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी पूर्ण लागू झाल्या पाहिजेत, आदी मागण्यांसह निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी निवेदन सादर करताना बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रभारी एडवोकेट सुनील डोंगरे साहेब, नागपूर झोन प्रभारी विजयकुमार डहाट, डी.एस रामटेके महाराष्ट्र प्रदेश सचिव, धारणे सर, इंजी. गोपालजी खांबालकर बामसेफ , जिल्हा प्रभारी प्रदीप खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष शंकर बोरकुट, जिल्हा प्रभारी गणपत तावडे ,जिल्हा सचिव भूजंगराव पात्रीकर, आरमोरी विधानसभा अध्यक्ष कृपानंद सोनटक्के, कोषाध्यक्ष जयद्रथ बोदेले ,विधानसभा सचिव अश्विन बोदेले, तुफान कोठांगले बीवीएफ संयोजक ,सुधीर बोदेले बसपा पदाधिकारी ,सिद्धार्थ घुटके, मनोज खोब्रागडे जेष्ठ कार्यकर्ते, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष कांता कांबळे, अरुणा खोब्रागडे ,व महिला आघाडीच्या अन्य महिला पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होत्या .

त्यानंतर कार्यकर्ता सम्मेलन आयोजित करण्यात आला.

 या कार्यकर्ता मेळाव्याला अध्यक्ष म्हणून एड. सुनील डोंगरे साहेब प्रदेश प्रभारी, तर प्रमुख अतिथी म्हणून डी. एस. रामटेके प्रदेश सचिव ,विजयकुमार डहाट, धरणे सर, गोपाळजी खांबलकर सर हे होते.

 मान्यवरांनी मान्यवर साहेब कांशीराम जी यांना स्मृती दिनाचे औचित्य साधून आदरांजली वाहिली. व त्यानंतर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये बहुजन समाजातील अनेक समस्या सोडवण्यासाठी सर्व बहुजन बांधवांना तन मन धनाने सहकार्य करून बहुजन समाज पार्टी चे सरकार बनवण्याचे आवाहन केले. 

महापुरुषांनी अथक संघर्ष करून आपल्याला मानवतावादी शिकवण दिली .त्या प्रमाणे मानवतावाद निर्माण करण्यासाठी सर्वांनी वेळात वेळ काढून समता मूलक समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन करण्यात आले. 

या कार्यकर्ता मेळाव्याचे संचालन मनोज खोब्रागडे यांनी तर आभार जयद्रथ बोदेले यांनी मानले .

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व बहुजन समाज पार्टी चे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com