कन्हान : – कांद्री येथील रहिवासी श्रीमती सुमनबाई विश्वनाथजी पोटभरे यांनी ग्रा पं. कांद्री च्या नवीन ईमारत बांधकामाकरिता जागा अपुरी पडत असल्याने आपली खाजगी २८८० स्के. फुट जागा ही ग्रा प कांद्री ला दान दिल्याने त्यांचा नागरी सत्कार मा. आ. सुनील जी केदार (माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र शासन) यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. 

       ग्राम पंचायत कांद्री च्या नविन इमारत बांधकामा करिता जागा अपुरी पडत असल्याने ग्रा प पदाधिका-यांच्या मागणी वरून कांद्री च्या जेष्ठ नागरिक श्रीमती सुमनबाई विश्वनाथजी पोटभरे यांनी आपली खाजगी २८८० स्के. फुट जागा ही ग्रा प कांद्री ला दान दिल्याने सुस्वज्य नविन ग्रा प इमारतीचे निर्माण झाल्याने त्यां चा नागरी सत्कार मा. आ. सुनीलजी केदार माजी कॅबिनेट मंत्री यांच्या शुभ हस्ते व राजेंद्रजी मुळक माजी मंत्री, सौ.रश्मीताई बर्वे अध्यक्षा जि.प.नागपुर, सौ.मीनाताई कावळे सभापती पारशिवनी, बलवंतजी पडोळे सरपंच, श्यामकुमार बर्वे उपसरपंच आदी मान्य वरांच्या प्रमुख उपस्थितीत संमारंभासह सत्कार कर ण्यात आला. या अगोदर सुद्धा त्यांचे पती स्व. विश्वना थजी पोटभरे यांनी सुद्धा गावाला पिण्याच्या पाण्याचा सोयीकरिता पाण्याच्या टाकीकरिता आपली खाजगी जागा ग्रा.पं. कांद्री ला दान स्वरूपात दिली होती. स्व. विश्वनाथजी पोटभरे यांचा पाऊलावर पाऊल टाकीत त्यांचा धर्म पत्नी यांनी सुद्धा आता ग्रा पं कांद्री ला जागा दान दिल्याने त्यांचा भव्य नागरी सत्कार ग्रा.पं. कांद्री व्दारे करण्यात आला . याप्रसंगी प्रामुख्याने ग्रा प सदस्य धनराज कारेमोरे, बैसाकु जनबंधु, प्रकाश चाफले, शिवाजी चकोले, चंद्र शेखर बावनकुळे, महेश झोडावाने, राहुल टेकाम, ग्रा पं सदस्या आशाताई कनोजे, दुर्गाताई सरोदे, वर्षाताई सिंगणे, सिंधुताई वाघमारे, मोनाली वरले, अरूणा हजारे, वर्षा खडसे, विभा पोटभरे, अरूणा पोहरकर आदीच्या प्रमुख उप स्थित श्रीमती सुमनबाई पोटभरे यांनी त्यांचा मुलगा श्री.भुपेंद्रजी पोटभरे यांचे सह उपस्थित राहुन हा सत्कार गावकऱ्यांच्या उपस्थित स्विकार करण्यात आला.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com