श्रमदानातून केली पांदण रस्त्याची डागडूजी… — ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज…

भविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

          महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये बनवलेले पांदण रस्ते आजही लाखो रुपये खर्च करून कच्च्या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात न झाल्याने आजही हजारो पांदन रस्त्यावरील शेतकऱ्यांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत चाललेली असून याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने सर्वप्रथम लक्ष देण्याची गरज शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

           असाच प्रकार धानोरा तालुक्यातील गट ग्रामपंचायत तुकूम यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून माती काम व पाईप टाकून बनवण्यात आलेला तुकुम- गोडेपार हा जवळपास अडीच किलोमीटरचा रस्ता बारा वर्षांपूर्वी माती काम तर कुठे पाईप टाकून माती काम, तर काही ठिकाणी बाजूला सुरक्षा भिंत तयार करून छोट्या लहान पुलाची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे.

          मात्र दरवर्षी पावसात अनेक ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी पाईप जवळील मातीच पुराने वाहून गेल्याने रस्त्यालगत व रस्त्यावरून ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण होत होती.

         याबाबत समस्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतकडे अनेकदा या रस्त्याविषयी व संपूर्ण ग्रामपंचायत क्षेत्रांतर्गत येत असलेल्या पांदण रस्त्याविषयी ग्रामसभेत सुद्धा दुरुस्ती करून कच्चा रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्यासाठी मतदारांनी अनेक वेळा आवाज उठवला होता.

           मात्र ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे कटाक्षाने दुर्लक्ष केले.पांदन रस्त्याचे कच्च्या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करणे हे ग्रामपंचायत प्रशासनाचे सर्वप्रथम पहिले कर्तव्य असते मात्र या ठिकाणी ग्रामपंचायत प्रशासनाला लेन देणे काहीच नसल्याचे दिसते.म्हणून वारंवार आवाज उठवणे ग्रामपंचायत प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने श्रमदान करण्याचे युवा पिढीने पाऊल उचलून दगड, माती आणून पुलाजवळील माती वाहून गेलेल्या ठिकाणी व खड्डे असलेल्या ठिकाणी ते बुजवण्यात आले.

         त्या ठिकाणाहून सर्व शेतकरी वर्गासहित पाळीव प्राण्यांना सुद्धा रस्त्याची दुरुस्थी केल्याने पाण्यात वाहून गेलेला रस्ता सुरळीत झालेला आहे हा रस्ता सुरळीत झाल्याने योगेंद्र गोटा, अंकुश गोटा, साजू मडावी, अंतराम हलामी, काशीराम वडे, गोपाल करंगामी,रघुनाथ नैताम,ज्योतीराम होळी, आदी श्रमदानं करणाऱ्यांचे समस्त गावकऱ्यांनी कौतुक केले आहे.

            “नरेगा योजनेतून किंवा इतर योजनेतून पांदण रस्त्याचे काम करण्यात आले त्यांचे कच्च्या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला, किंवा उपविभागीय अधिकारी (जिल्हा परिषद बांधकाम) उपविभाग धानोरा यांना ग्रामसभेद्वारे पत्र देऊन त्यामध्ये कच्च्या रस्त्याचे रूपांतर पक्क्या रस्त्यात करण्यासाठी त्या रस्त्यावर ग्रामीण मार्ग नंबर देऊन ते मग काम पुढील नियोजनानुसार केले जाते.

          मात्र याविषयी ग्रामपंचायतीला सोयर सुतक नसल्याने पुढे अशाप्रकारे केलेच नाही. त्यामुळे ग्रामपंचायतचा भोग हा शेतकऱ्यांना बसत आहे. आता तरी ग्रामपंचायत प्रशासनाने याकडे डोळे उघडून नीट काम करतील काय हे शेतकऱ्यांना पहायचे आहे”.