अपघात टाळण्यासाठी निमगाव परिसरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवा :- गजानन मेश्राम भाजपा तालुका उपाध्यक्ष…

भाविकदास करमनकर 

 तालुका प्रतिनिधी धानोरा 

        धानोरा तालुक्यातंर्गत मौजा निमगाव ते रांगी रोड,निमगाव ते बोरी रोड व निमगाव ते बोरी या तीन्ही रोडवर मोठ मोठ खड्डे पडले आहेत.त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

        अनेक व्यक्ती सदर रस्त्यांवरील खड्यामध्ये पडले आहेत.त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

         खड्यांमुळे होणाऱ्या अपघातांचे वास्तव लक्षात घेता रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवून नागरिकाला जाण्या योग्य रस्ता करून द्यावा अशी मागणी धानोरा तालुका उपाध्यक्ष गजानन मेश्राम यांनी केली आहे.

       उपविभागीय सार्वजनिक बांधकाम धानोरा यांनी तीन पैकी दोन रोड मंजूर झाले असल्याची माहिती दिली व अभियांत्याचा संप संपताच काम सुरु करण्यात येईल असे प्रभारी उपविभागीय अभियंता बी.सी.धार्मिक यांनी सांगितले.