रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधि
चिमूर :- स्थानिक राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात गृह अर्थशास्त्र विभागांतर्गत राष्ट्रीय पोषण सप्ताहचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील आहारतज्ञ डॉ.जयश्री वाघमारे तसेच उपजिल्हा रुग्णालय, चिमूर रेड रिबन क्लब समन्वयक कु कामिनी हालमारे उपस्थित होत्या.
आहारतज्ञ डॉ.जयश्री वाघमारे यांनी विद्यार्थिनीना समतोल आहार,कार्बोहायड्रेट प्रथिने, वसा,फायबर, जीवनसत्वे याबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात वर्तमानकाळात व्यायामासोबत समतोल आहार महत्वाचा आहे. आहारात भरड धान्याचा समावेश असावा असे सांगितले.
प्रस्ताविक गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शितल वानखेडे यांनी केले.संचालन कु. प्रतीक्षा चौधरी आणि आभार कु.प्रीती मेश्राम हिने केले. या कार्यक्रमाला गृहअर्थशास्त्र विभागाच्या विद्यार्थीनीचा उदंड प्रतिसाद मिळाला.