धानोरा शहरात ईद-ए-मिलाद उन-नबीचा सण उत्साहात साजरा…

भाविकदास करमनकर 

 धानोरा तालुका प्रतिनिधी 

           इस्लामिक कॅलेंडरनुसार, हा सण दरवर्षी रबी-उल-अवलच्या 12 व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी मुहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता, म्हणून हा दिवस विशेषतः साजरा केला जातो आणि याला ईदची ईद देखील म्हटले जाते. पैगंबर अल्लाहचे दूत आणि इस्लामचे मार्गदर्शक म्हणून ओळखले जातात. त्यांची जयंती मुस्लिम धर्मात सण म्हणून साजरी केली जाते.

           इस्लाम धर्मात असे मानले जाते की अल्लाह वेळोवेळी आपले दूत पाठवत असतो, जे लोकांना योग्य मार्गावर जाण्याचा सल्ला देतात. अल्लाहचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते या पृथ्वीवर जन्माला आले आहेत. त्यांना नबी आणि पैगंबर म्हणून ओळखले जाते. मुहम्मद पैगंबर यांच्याबद्दल सांगायचे झाले, तर ते अल्लाहचे शेवटचे दूत म्हणून ओळखले जातात.

            इतिहासानुसार, मुहम्मद यांना त्यांच्या आयुष्यात खूप संघर्षांचा सामना करावा लागला आणि समाज सुधारण्याच्या त्यांच्या प्रवासात त्यांनी अनेक चढउतारांचा सामना केला. म्हणून हा दिवस त्यांच्या नावाने समर्पित करण्यात आला आहे आणि म्हणूनच हा आजचा दिवस यांच्या आठवणीत साजरा केला जाते. ते अतिशय दयाळू आणि करुणेने परिपूर्ण होते. त्यांचे व्यक्तिमत्व इस्लाममध्ये एक आदर्श म्हणून ओळखले जाते. या दिवशी लोक पैगंबरांचे स्मरण करतात आणि उपवास करतात.

          भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो म्हणूनच धानोरा शहरात सुन्नी जामा मस्जिद तर्फे आज हा सण साजरा करण्यात आला, सणाची सुरवात मस्जिद पासून रॅली काढून करण्यात आली आणि वाहतुकीला कोणतीही अडचण निर्माण व्हायला नको म्हणून आमचे पोलीस मित्रांनी पण सहकार्य केले नंतर धानोरा शहर चौकात श्री. मलिक भाऊ बुधवानी यांच्या बिल्डिंग सामोर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.

           तसेच ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळ आणि बिस्किटे वितरीत करण्यात आले.या प्रमाणे शांततेत शांतीदूत हजरत पैगंबर मोहम्मद चा जन्मदिन साजरा करण्यात आला.

            याप्रसंगी धानोरा मस्जिद चे इमाम सर्वश्री मोहसीन रजा, महेफुझ रजा मस्जिद चे अध्यक्ष मुस्ताक कुरेशी, महमूद पठाण, मुबारक अली सय्यद, शब्बीर शेख, समिर कुरेशी, जमीर कुरेशी, शारिक शेख, अफरोज शेख, सरफराज शेख, राजू पठाण, शकील पठाण, जमील शेख, नवेज शेख, हारून पठाण, रियाज शेख, व इतर सर्व मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.