रामदास ठुसे
विशेष विभागीय प्रतिनिधी..
चिमूर :- आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सभागृह लोकार्पण व भगवान गौतम बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापणा संदर्भात सुगतकुटी (मालेवाडा)ला भेट दिली आणि गगन फाउंडेशनचे पदाधिकारी व बौद्ध कमिटीच्या पदाधिकाऱ्यांसी आज चर्चा केली.
तत्पूर्वी आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी भगवान गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस नमन केले.
कार्यक्रम आयोजित स्थळी बौद्ध कमिटीचे जयंत गौरकर,शैलेद्र पाटील,लीलाधर बनसोड,सावन गाडगे,सतीश वानखेडे,सागर भागवतकर,पराग अंबादे,उत्कर्ष मोटघरे,आदित्य वासनिक सह बौद्ध कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान आमदार बंटीभाऊ भांगडिया यांनी सा.बा.चे उपविभागीय अभियंता उपगलनवार व गगन फाउंडेशनच्या पूनम गायकवाड यांचेशी बांधकाम संदर्भात चर्चा केली.
यावेळी भाजप प्रदेशउपाध्यक्ष राजु देवतळे,भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे,भाजयुमो प्रदेश सचिव मनीष तुंम्पलीवार,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे,संजय गांधी निराधार समिती अध्यक्ष संजय नवघडे, भाजप युवा नेते समीर राचलवार,भाजप तालुका महामंत्री प्रशांत चिडे,सुधीर पोहनकर तालुका महामंत्री हेमराज दांडेकर,नितेश दोडके,अविनाश सोनवणे, गजानन जाभूळे,प्रणय हनवते, जगदीश जांभूळे,नरेंद्र हजारे,मनी रॉय उपस्थित होते.