ओबीसी काँग्रेसच्या तालूका अध्यक्षपदी ईश्वर डुकरे… 

     रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

चिमूर :- अनेक वर्षापासून राजकीय क्षेत्रात सक्रीय संघटन कौशल्य वाक चातुर्य त्याग समर्पण सेवाभाव व समाजकार्याची वृत्ती पाहता चिमूर तालुका काँग्रेस कमेटीने ईश्वर लक्ष्मन डूकरे यांना चिमूर तालुका काँग्रेस ओबीसी तालुका अध्यक्ष पदावर सोमवारला नियुक्ती केली.

       काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार, खा. डॉ.नामदेव किरसान, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामिण जिल्हाध्यक्ष आ.सुभाष धोटे,महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी डॉ.अविनाश वारजूकर, यांच्या मार्गदर्शनात काँग्रेस पक्षाची प्रतिमा जनमानसात पोहचवून अधिकअधिक कार्यकर्ते पक्षासी जोडल व पक्षाला कोणतेही बाधा होणार नाही.याची काळजी घेत चिमूर तालूका काँग्रेस कमेटीचे तालूका अध्यक्ष डॉ.विजय गावंडे यांनी ईश्वर डुकरे यांना नियुक्ती पत्र दिले. 

         नियुक्ती पत्र देताना चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतिश वारजूकर प्रा. राम राऊत, किशोरबापू शिंगरे, गजानन बुटके, सचिन गाडीवार, अविनाश अगडे आदी काँग्रेस पदाधीकारी उपस्थित होते.