निरा नदीवरील लुमेवाडी बंधाऱ्याचा भरावा पाण्याच्या वेगाने वाहून गेला…  — तर येजा करणारी वाहतूक बंद झाल्यामुळे ग्रामस्थांची चिंता वाढली…

 बाळासाहेब सुतार

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी

           नीरा नदीला आलेल्या पुरामुळे लुमेवाडी येथील बंधाऱ्याचा भरावा पाण्याने वाहून गेला.लुमेवाडी (ता. इंदापूर) व माळीनगर (ता. माळशिरस) यांना जोडणारा नीरा नदीवरील बंधारेचा भराव पाण्याच्या दाबामुळे तिसऱ्यांदा वाहून गेला आहे. त्यामुळे लुमेवाडी ते माळीनगर मार्गावरील वाहतूक पुर्णपणे बंद झाली आहे. 

           लुमेवाडी येथील कोल्हापूरी पद्धतीचा बंधारा पुराच्या पाण्याने वाहून गेला आहे.लुमेवाडी बाजूकडील जवळपास पन्नास फूट एवढा असणारा भराव तसेच माळीनगर बाजु कडील दोनशे फुट भरावा पाण्याचा दाबामुळे वाहून गेला आहे. 

           पाण्याच्या रेट्यामुळे धोका निर्माण झाल्याने बंधाऱ्याच्या दोन बाजू वाहून गेलेले आहेत. यामुळे दोन तालुक्याची वाहतूक लुमेवाडी येथील बंधाऱ्यावर बंद झालेले आहे. ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

              तिसऱ्यांदा असा प्रकार होत असल्यामुळे निकृष्ट दर्जाची कामे होत आहेत याकडे शासनाने लक्ष घालावे, ग्रामस्थांची मागणी.

          दरम्यान संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे, माजी आमदार हर्षवर्धन पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून नीरा नदीवरील बंधारे दुरुस्ती करण्याची कामे करावीत ग्रामस्थांची चर्चा.