राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालयात रानभाजी महोत्सव…

      रामदास ठुसे 

विशेष विभागीय प्रतिनिधि 

 चिमूर :- स्थानिक गांधी सेवा शिक्षण समिती द्वारा संचलित राष्ट्रसंत तुकडोजी महाविद्यालय चिमूर येथे गृहअर्थशास्त्र विभागाच्या वतीने रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आलेला होता.

           रानभाजी प्रदर्शनात तांदूळजा, कुडा, गोपी,अंबाडी टाकला माठ केन भाज्यांना ठेवण्यात आले होते. वर्तमान काळात रानभाज्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहे म्हणून नव्याने विद्यार्थ्याना ओळख व्हावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

          या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.अश्विन चंदेल होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, रानभाजीतून विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताना रोजगार मिळवता येतो यासाठी विद्यार्थिनींनी कसोशीने प्रयत्न केले पाहिजे.

         आजच्या जागतिकीकरणाच्या काळात रानभाज्यांचे व्यापार करून त्याचे आहारातील जीवन सत्वासह महत्व जगाला पटवून दिले पाहिजे.प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रफुल राजुरवाडे हे होते.

          त्यानी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की लुप्त झालेल्या रानभाज्याना आपल्या आहारात समाविष्ट केले पाहिजे. रानभाज्या पेस्टीसाईड नसतात म्हणून रानभाजी खाण्याचे फायदे अनेक आहे.असे यावेळी विशद केले.या प्रसंगी शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक डॉ.उदय मेंदुलकर उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गृहअर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.शीतल वानखेडे यांनी केले. तसेच या कार्यक्रमात गृह अर्थशास्त्र विद्यार्थ्यांनी रानभाज्यांचे महत्त्व व त्या भाज्या कशा कराव्यात यांचे प्रात्यक्षिक करून दाखविले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.