कविवर्य बाबुराव पाईकराव यांना उत्तराखंड येथील ‘भारतेन्दू हरिश्चन्द्र हिंदी लेखक सन्मान’ पुरस्कार…

शहर प्रतिनीधी अमरावती

          डोंगरकडा येथील कै.बापुराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सहशिक्षक साहित्यिक बाबुराव पाईकराव यांना नैनिताल,उत्तराखंड येथील प्राची डिजिटल पब्लिकेशन यांच्याकडून दिला जाणारा २०२४चा ‘भारतेन्द्र हरिश्चंद्र हिन्दी लेखक सन्मान’ पुरस्कार मिळाला.

             उत्तराखंड येथील प्राची डिजिटल पब्लिकेशन संपूर्ण भारतातून प्रासंगिक विविध विषयावर हिंदी भाषेत गद्य आणि पद्यात्मक प्रतिनिधीक स्वरूपात साहित्यातील सर्व प्रकारातील साहित्य मागवित असते. त्यातील निवडक साहित्यावर ते ग्रंथ स्वरूपात प्रकाशित केले जाते.

            हिंदी दिवसाचे औचित्य साधून ‘हिंदी – देश की शान’ या विषयावर काव्य आणि लेख मागविण्यात आले होते.त्यानिमित्त भारतातील एकूण निवडक २५ साहित्यकारांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील कविवर्य बाबुराव पाईकराव यांचे ‘हिंदी हमारी शान,’ याविषयावरील काव्य आहे. त्याबद्दल

           बाबुराव पाईकराव यांना ‘भारतेन्दु हरिश्चंद्र हिंदी लेखक सन्मान-२०२४’ पुरस्कार देवून सन्मानित केले आहे.

             बाबुराव पाईकराव हे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लिखाण करतात.ते इंग्रजी विषयाचे शिक्षक आहेत.तरी त्यांचे हिंदी आणि मराठी भाषेत विविध विषयांवर लेख,शोधनिबंध, काव्य, समिक्षणाचे लेखन वृत्तपत्रामधून प्रकाशित होत असते. त्यांची मराठी,हिंदी आणि इंग्रजी मधील बरीच पुस्तके प्रकाशित आहेत.

            या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सोपानरावजी नादरे,अँड.संदीपभाऊ नादरे, सचिव खंडूअण्णा माळवटकर,शाळा समिती अध्यक्ष दत्तराजी अडकिणे, कॉलेज समिती अध्यक्ष दिलीपराव देशमुख तसेच शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक नितीन बोंद्रे, उपमुख्याध्यापक विजयकुमार कांबळे, पर्यवेक्षक नंदकुमार मिरासे, उपप्राचार्य संदीप सोळंके आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकबंधू भगिनी आणि मित्र मंडळी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.