गेल्या 60 वर्षांपासून देशाच्या व राज्याच्या निवडणुकीत केवळ कुटनीतीचे राजकारण…..  — त्यात आम्ही ( भारतीय जनता ) कुठे?  — भाग – 4 – A 

       “विसाव्या शतकातील जागतिक रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती नको. म्हणून भारतीय संविधानाची निर्मिती…

         “आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि विशेषतः इंग्लंडमधून सोळाव्या शतकात सुरुवातीला मानवी कल्याणासाठी म्हणून सुरुवात झालेली वैज्ञानिक क्रांती,एकोणीसाव्या शतकाच्या शेवट येईपर्यंत तीने केवळ सत्ताधाऱ्यांच्या राजकीय अती महत्वाकांक्षेमुळेच अमानवीय रुप धारण केले होते..

            त्यातून पुढे विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच प्रत्येक प्रगत आणि सधन राष्ट्राने संरक्षणाच्या नावाखाली शस्त्रात्र निर्मिती केली. परिणामी साम्राज्यवादाची स्पर्धा युरोप खंडात निर्माण झाली.

          त्यातच जर्मनीच्या कैसर विल्यमने युरोप खंडातील प्रगत आणि सधन बलाढ्य राष्ट्रातील सत्ताधारी राजे व हुकूमशहा यांचे एकमेकांच्या विरोधात कान भरून संपूर्ण युरोप खंडात एक अविश्वासाची वादळापूर्वीची शांतता निर्माण केली.

            असे म्हणतात की पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाला जर्मनीच कारणीभूत आहे.एका बाजूनी तेही खरेच आहे.कारण कैसर विल्यम आणि हिटलर हेच या दोन्ही भयंकर विनाशाला कारणीभूत ठरले.

         या साम्राज्यवादी स्पर्धेतून शस्त्रात्रात वरचढ असलेली राष्ट्रे एकमेकांसमोर येऊन उभी टाकली. कच्च्या मालासाठी आणि आपल्या देशातील तयार झालेल्या पक्क्या मालाच्या अव्वाच्या सव्वा किमतीने विकून भरपूर नफा मिळविण्यासाठी अप्रगत वसाहती आणि बाजारपेठांची गरज प्रगत युरोपातील सर्वच राष्ट्राना होती.

        म्हणून जगातील इतर मागास आणि अतिमागास देशांचा यासाठी या प्रगत युरोपियन देशांकडून वापर होऊ लागला.जेंव्हा संपूर्ण विश्व् संपत आले, तेंव्हा हीच राष्ट्रे एकमेकांसमोर लढण्यासाठी येऊन उभी टाकली.

           या खुमखूमितूनच पुढे 1914 ते 1918 या 5 वर्षात पहिले महाभयंकर जागतिक महायुद्ध घडले.  

        एका बाजूला दोस्त राष्ट्रे तर दुसऱ्या बाजूला शत्रू राष्ट्रे.दोस्त राष्ट्रात अमेरिका,इंग्लंड,फ्रांस,रशिया ही प्रमुख राष्ट्रे होती,तर शत्रू राष्ट्रात जर्मनी, ऑस्ट्रिया,हंगेरी,तुर्कस्तान,जपान इत्यादिचा समावेश होता.

       ज्ञ सुमारे दोन कोटी दोन्ही बाजूचे सैनिक मारल्या गेले.निरपराध जनता सुद्धा त्यात मारल्या गेली. वित्तहानी सुद्धा अमर्याद झाली.थोडक्यात जग पुन्हा 300 वर्षे आर्थिक प्रगतीच्या मानाने मागे फेकल्या गेले.येथे सांस्कृतिक प्रगतीचा विषयच नव्हता….

           या महाभयंकर जागतिक महायुद्धानंतर या पृथ्वीतलावर असे कधीच आणि कुठेही रक्ताचे पाट वाहू नये म्हणून अमेरिका आणि इंग्लंड यांच्या पुढाकाराने “राष्ट्रसंघाची” निर्मिती झाली सुरुवातीला लहानमोठ्या 24 देशांनी मिळून हा संघ उभा केला. याचा उद्देशच हा होता की,कुणीही कुणावर युद्ध लादायचे नाही. शांततेच्या मार्गानेच तोडगा काढून सर्वांनी मध्यस्थी करून रक्तपात थांबवायचा.

         अशातच पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यामुळे आणि येथील सम्राट कैसर विल्यम ( ज्याने एकमेकांची काने भरली होती ) देश सोडून पळाल्यामुळे जर्मनीत दोस्त राष्ट्राविरुद्ध जनतेत असंतोष वाढत होता. 

        त्यातच दोस्त राष्ट्रानी जर्मनीवर अनेक प्रकारचे दंड लावून आर्थिक शिक्षा करून जर्मनीला होत्याचे नव्हते केले होते. त्यामुळे जनतेत विजय दोस्त राष्ट्राविषयी असंतोष धूमसत होता. 

       याचाच लाभ उठविण्यासाठी पहिल्या महायुद्धात एक देशभक्त सैनिक म्हणून लढलेला हिटलर जेंव्हा कैसर विल्यम जर्मनीच्या पराभवानंतर देश सोडून पळाला. तेंव्हा हा हिटलर देशासाठी एका लहान लेकरासारखा ढसाढसा रडला.त्याने जर्मनीतील जनतेतील या असंतोषाला कधीही थंड होऊ दिले नाही.

        अवघ्या वीस वर्षात निवडणुकीच्या माध्यमातून जर्मनीला कर्जातुन बाहेर काढून, स्वावलंबी बनवून जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था बनविली. आणि पुन्हा दोस्त राष्ट्राचा पहिल्या महायुद्धातील पराभवाचा सुडाचा बदला घेण्यास सिद्ध झाला.

अवघ्या वीस वर्षातच…. 

 ” राष्ट्रसंघांचे “अल्पायुष्य ठरले. हिटलरने प्रथम पोलंडवर 1939 मध्ये आक्रमण करून दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात केली.यावेळी सुद्धा दोस्त व शत्रू राष्ट्राचे दोन गट पडले.पहिल्या महायुद्धापेक्षा कित्येक पटीने भयंकर असे हे दुसरे महायुद्ध घडले. 

       सहा वर्षे हे युद्ध चालले.जेंव्हा हे युद्ध लांबत होते तेंव्हा याला लवकरात लवकर संपवून जगजेत्ता होण्यासाठी हिटलरच्या विकृत डोक्यात प्रथम महाभयंकर बॉम्ब बनविण्याची कल्पना आली ( अणुबॉम्ब बनविण्याची ) त्यासाठी त्याने तयारी सुद्धा शास्त्रज्ञास करायला सांगितली.परंतु,ही गोष्ट जेंव्हा अल्बर्ट आईनस्टाईनच्या कानावर आली,तेंव्हा त्यांना वाटले की,यात हिटलर यशस्वी झाला तर जगाचा विनाश आहे.

          म्हणून ही बाब त्यांनी तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष रुझवेल्ट यांच्या कानावर घातली.पुढे डॉ.रॉबर्ट ओपन हायमर,अल्बर्ट आईनस्टाईन आणि डॉ.लिनस पाउलिंग या तीन प्रमुख शास्त्रज्ञाच्या मार्गदर्शनात ” मॅन हॅटन प्रोजेक्ट ” कल्पना पुढे येऊन दुसरे महायुद्ध कसे संपून जगाची वाटचाल पुढे कशी झाली.

      याचा इतिहास उद्याच्या याच लेखाच्या उर्वरित भागात….

          जागृतीचा लेखक

             अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…