मौजा कोढासावली येथे भिवसन पेंच शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे तान्हा पोळा साजरा…

 

      कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

 

पारशिवनी:-तालुकातील कोढासावली गाव येथे भिवसन पेंच शेतकरी उत्पादक कंपनी लि, कोंडासावळी ता,पारशिवनी तर्फे दरवर्षी प्रमाणे लहान मुलांचा ताना पोळा निमित्ताने मारबत बडग्या रैली काढन्यात आली.

          पुर्ण गाव फिरून शेवटी गावातील बाहेर,”मारबत वडग्या,ला जाळण्यात आले.

          तसेच गावात गायत्री महीला भजन मंडळचे सुदाम आपुरकर,बालीबाई डुबें,उषाताई दुनेदार,वंदना आपुरकर व किष्णा छोटे तर्फे महिलांच्या भंजनाचा कार्यक्रम करण्यात आला व नंतर दहीकाल्याचा भव्य कार्यक्रम करण्यात आला.

         सर्वांना दहीलाईचा प्रसाद वितरण करण्यात झाल्यावर नंदिबैल पोळा भरवण्यात आला.यात तान्हा पोळा आयजकाने लाकडाच्या नंदिबैलांची पुजा भारती दुनेदार व स्नेहल दुनेदार,राजेन्द दुनेदार यांचे हस्ते करन्यात आली.

          पुजा पश्चात बालगोपालना व गायत्री भजन मंडळाचे सभासदाना भिवसन पेंच शेतकरी उत्पादक कंपनी तर्फे पानी बाटल,दहिलाई चाकलेट,शैक्षणिक साहित्य वाटप करन्यात आले.