पंकज चहांदे
तालुका प्रतिनिधी
दखल न्यूज भारत
देसाईगंज :-
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आ. आनंदराव गेडाम यांच्या उपस्थितीत दि. 13 सप्टेंबर 2023 ला स्थानिक विश्राम गृह येथे कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न झाली.
या आढावा बैठकीत विविध विषयावर चर्चा करून संघटन मजबुत करणे व काँग्रेस पक्षाचे विचार घराघरात पोहविण्याकरीता पक्षवाढकरीता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तर काही नविन चेहऱ्यांना कॉंग्रेस पक्षात पदभार देण्यात आला. यात खासकरून तालुका संघटक म्हणून सुरेश तोंडफोडे, तालुका सचिव भुमेश्वर सिंगाडे, तालुका सहसचिव दत्तात्रय लेनगुरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष राजेंद्र बुल्ले, जिल्हा कॉंग्रेस उपाध्यक्ष नरेंद्र गजपुरे, तालुका उपाध्यक्ष संजय कराकर, नितीन राऊत, महासचिव मनोहर निमजे, दुर्वास नाईक, निरीक्षक टिकाराम सहारे, सचिव जगदिश सेंद्रे, महासचिव विलास बन्सोड, संघटक राजेश राऊत, देवानंद भुरके, अस्मिता मिसार, सचिव गोपाल बोरकर, नानाजी सयाम, युकॉ. तालुका अध्यक्ष पंकज चहांदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.