कमलसिंह यादव

प्रतिनिधी

       

       पारशिवनी :- घोगरा येथे युनीवर्सल कन्स्ट्रक्शन मटेरियल इंडस्ट्रीज फ्लाय एश ब्रिक्स कंपनीच्या शेड बांधकामांकरीता आणून ठेवलेले ७२ हजार रुपयांचे विविध साहित्य चोरट्यांनी लंपास केले असल्याची घटना पारशिवनी पोलिस ठाण्यातंर्गत समोर आली आहे.

          पो.स्टे . पारशिवनी यांचा हद्दीत अंतर्गत ०१ कि . मी . अंतरावरील मौजा युनीवर्सल कन्ट्रक्शन मटेरियल इंडस्ट्रीज प्लाय एश ब्रिक्स कंपनी घोगरा रोड , पारशिवनी येथे दिनांक २ ९ / ०८ / २०२२ चे १२.०० वा . ते दिनांक १४ / ० ९ / २०२२ चे १५.०० वा . सुमारास फिर्यादी नामे – अक्षय बंडुजी पाटील , वय २६ वर्ष रा . न्यु सुभेदार ले आउट हुडकेश्वर रोड यांनी आपले युनीवर्सल कन्ट्रक्शन मटेरियल इंडस्ट्रीज प्लाय एश ब्रिक्स कंपनी घोगरा येथे शेड बांधकामाकरीता आणुन ठेवलेले (१) २ बाय २ चे एकुण ३८ पाईप जुनी वापरती कि ३२,००० / – रू .

(२) २० फुट लांबीचे एकुण १४ एंगल बीम जुनी वापरती कि . २०,००० / – रू . , (३) १४ कॉईल शीट प्लेट जुनी वापरती कि . २०,००० / – रू .

 असा एकुण कि . ७२,००० / – रू . चा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेले .

      उक्त प्रकरणी तक्रारदार यांच्या तक्रारी वरून पो.स्टे . पारशिवनी येथे अज्ञात चोरट्या आरोपी विरुध कलम ३७९ भादंवि कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे . 

    आरोपीचा शोध घेणे सुरू असून पोलिस निरिक्षक राहुल सोनवने यांचे मार्गदर्शनात गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार जयंता शेरेकर हे करीत आहे .

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com