चेतक हत्तीमारे
जिल्हा प्रतिनिधी
साकोली:- देशात नवरात्र उस्तव मोठ्या उस्साहात साजरा करण्यात येतो. मात्र कोरोना संसर्गजण्य रोगाचा प्रादुर्भाव मुळे मागील वर्षी गरभा नृत्य करण्यास बंदी होती. परंतु या वर्षी नवरात्र उस्साहाची तयारी जोरदार सुरू आहे. या तयारी दरम्यान साकोली मध्ये दांडीया गरभा नृत्य स्पर्धा प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .
साकोली येथे दि.१६/०९/२२ रोज शुक्रवारला आदरणिय सौ.सरिताताई सुनिलभाऊ फुंडे यांचे वाढदिवसाच्या प्रसंगी लहरीबाबा मठ देवस्थान येथे स्टार गृपच्या वतीने दांडीया गरभा नृत्य स्पर्धा प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले .या वेळी उद्घघाटन सौ.सरिताताई सुनिलभाऊ फुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी प्रभाकरजी सपाटे, हेमकृष्णजी वाडीभस्मे, अनिल टेंभरे,निखील जिभकाटे,बंटी गजापुरे,सौ.किरण भुरे,आंचल साखरे,आकांक्षा टेंभुर्णे,स्नेहा भुरे,सुनिता शेंडे आणि इतर प्रशिक्षनार्थी उपस्थीत होते.