उमेश कांबळे ता प्र भद्रावती
अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, श्री त्र्यंबकेश्वर,जिल्हा नाशिक, सद्गुरू प.पू.मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत मोफत आरोग्य नाडी तपासणी परीक्षण व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन सोमवार दि.१९ सप्टेंबरला १० ते ५ वाजेपावेतो स्थानिक श्री संत झिंगुजी महाराज मठ येथे करण्यात आले आहे.
या शिबिरात तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शन लाभत असुन हृदयविकार,मधुमेह, सर्वप्रकार चे कर्करोग, रक्तदाब, सांध्याचे विकार, त्वचा विकार, वात पोटांचे विकार, महिलांचे आजरा विषयी, कावीळ, लहान मुलांचे विकार, मनोविकार आदी विकारांचे रोग निदान केले जातील. या शिबिराचे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बाल संस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) भद्रावती व श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भद्रावती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले असून या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा.असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भद्रावती च्या समितीने केले आहे.