उमेश कांबळे ता प्र भद्रावती
पंचायत समिती भद्रावती अंतर्गत तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात आवड निर्माण होवून अनेक नवनवीन प्रयोग विद्यार्थ्यांनी करावे हा हेतू साध्य करण्यासाठी ही विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली जाते.
विज्ञान प्रदर्शनी मध्ये भद्रावती तालुक्यातील अनेक विद्यालयांनी सहभाग नोंदविला. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये भद्रावती येथील यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी या शाळेतील विद्यार्थ्यांने सादर केलेल्या प्रयोगाला प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे.
यशवंतराव शिंदे विद्यालय येथील नवव्या वर्गातील विद्यार्थी अर्जुन प्रशांत सोनुले यांनी अपघात दर्शक यंत्र ही प्रतिकृती तयार केली व तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये ती सादर केली.
या अपघात दर्शक यंत्र प्रतिकृतीला तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी प्रथम क्रमांक मिळविला आहे.
ही तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी ऑनलाईन घेण्यात आली. यात भद्रावती तालुक्यातील अनेक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विज्ञान मॉडेल तयार करून या प्रदर्शनीत सादर केले . यात यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती येथील प्रशांत सोनुले यानी सादर केलेल्या प्रतिकृतीला प्रथम क्रमांक मिळाला.
त्याला विज्ञान शिक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे सचिव डॉ. कार्तिक शिंदे, यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, पर्यवेक्षक
ताजने , बोरकुटे, डॉ. ज्ञानेश हटवार , ढोक सर व समस्त शिक्षका,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.