सावली (सुधाकर दुधे)

 

     सावली तालुक्यातील निलसनी पेडगाव परिसरात वाघाच्या हल्यात बैल गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक १५ ला सायंकाळी ५.००वा.च्या सुमारास घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे . वाघाच्या हल्यात पेडगाव येथील श्री. काशिनाथ माधव चुधरी यांच्या बैलाला वाघाने गंभीर जखमी केले आहे. गावातील गुराखी श्री देवाजी मेश्राम व आबाजी पेंदोर नेहमीप्रमाणे गावातील गुरे चारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमागील अंदाजे अवघ्या 1000 फुटावरील अंतरावर डोंगरीवरती नेली . परतीच्या वेळेस दबा धरुन बसलेल्या वाघाने बैलावर झडप घातली. इत्तर जनावरे सैरावरा पळू लागले पण तोपर्यंत वाघाने बैलाची खोंड आपल्या जबड्याने पूर्णतः फोडून काढली. गुराख्याच्या वेळीच आरडा ओरड केल्याने वाघाने जंगलाकडे पळ काढला. बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले.ही घटना गावात पसरताच ग्रामस्थांनी घटना स्थळी धाव घेतली. 

     याच आठवडयात सोनापुर येथे स्वतःच्या मालकीचे जनावर चराईसाठी घेऊन गेलेल्या एका इसमावर वाघाने हल्ला करून जखमी केल्याची घटना सावली वनपरीक्षेत्र येणाऱ्या सामदा बूज क्षेत्रातील सोनापूर बीटात मागील चार दिवसाअगोदर घडली. प्रमोद गणपत मोटघरे वय ३५ वर्ष असे वाघाच्या हल्यात जखमी झालेल्या इसमाच नाव आहे.

         सावली तालूक्यातील सोनापूर,कापसी व्याहाड,उपरी ला लागून मोठ्या प्रमाणावर जंगलं व्याप्त परिसर असून वन्यप्राणी हे मोठ्या प्रमाणावर आहे. सोनापूर येथील प्रमोद गणपत मोटघरे स्वताच्या मालकीचे जनावर चराई साठी सामदा बीट सोनापूर पेडगाव च्या जवळीस जंगलात नेले होते त्या दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर व त्यांच्या बैलावर हल्ला करून जखमी केले.या घटनेची माहिती गावकर्यांना होताच गावकर्यांनी जखमी इसमाला प्राथमिक उपचाराकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र व्याहाड येथे घेऊन गेले व त्याच्यावर प्राथमिक उपचार करून जखमी इसमास गडचिरोली सामान्य रुग्णालय येथे पाठविण्यात आले सदर घटनास्थळाला वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील आठवड्याभरात दूसरी घटना घडल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

             तालुक्यातील वाघ आणि बिबट्याचा हल्याच्या घटनेत दिवंसे दिवस वाढ होत आहे तरी वन विभागाने दखल घेऊन वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी सोनापूर,कापसी, नी.पेडगाव सामदा येथील ग्रामस्थानी केली आहे.

0Shares

By Dakhal News Bharat

भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (IntermediaryGuidelines and Digital Media Ethics Code- Rules 2021) मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत सदर न्यूजपोर्टल Digital Media Publishers & News Portal Grievance Council of India” स्वनियमन संस्थेकडे (Rule १८नुसार) Reg. No- DMPNPGCI007 नोंदणीकृत आहे. डिजिटल माध्यमांसाठीच्या आचारसंहितेनुसार आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास भारत सरकारच्या कायद्यानुसार स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. newsportalpublishergrievances@gmail.com