चामोर्शी नगरपंचायत अंतर्गत घरकुल बांधकामाचा प्रश्न सुटला…. — अखेर एन.ए. ची अट रद्द..

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

— आता सातबारा असलेल्या जमीन मालकांना व प्लाट धारकांना घरकुल किंवा इतर बांधकाम परवानगी साठी NA करण्याची गरज नाही..

— गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांच्या पुढाकाराने व नगरसेवक आशिष पिपरे यांच्या पाठपुराव्या मुळे सदर मागणीला यश …

चामोर्शी:- 

      उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे घरकुल व इतर घरे बांधकाम करण्यासंबंधाने अळचणीच्या बाबतीत निवेदनाद्वारे सविस्तर माहिती द्वारा मागणी केली होती.

         मागणी अन्वये प्रत्यक्ष नागपुर येथे भेट घेऊन वारंवार पाठपुरावा केला होता.

        नगरसेवक आशिष पिपरे यांच्या मागणीची दखल घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावठाण व आखिवपत्रिकेची अट रद्द केली.

        आता फक्त 3 वर्षाच्या घरटॅक्स पावतीच्या आधारावर मिळणार घरकुल मिळणार आहेत.चामोर्शी शहरात बहुतेक पात्र गरीब लाभार्थी हे शासकीय जागेवर गेल्या 20 ते 25 वर्षानुसार राहत होते तसेच अनेक गरीब पात्र लाभार्थी पिढ्यानपिढ्या कृषक (7/12 असलेल्या) जागेवर घर बांधून राहत आहेत व त्यांना घरकुलाची जास्त आवश्यकता असतांना आखिव पत्रिकेमुळे व गावठाणच्या अटीमुळे बरेच लाभार्थीना लाभापासून वंचित रहावे लागत होते.

         ही नागरीकांची अळचण लक्षात घेऊन नगरसेवक आशिष पिपरे यांनी जिल्हाधिकारी, संबंधित खासदार व आमदार यांना वारंवार निवेदनातून समस्या बाबत मागणी केली होती.

         शेवटी खासदार अशोक नेते यांनी सदर प्रश्न लोकसभेत लावून धरला व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वारंवार निवेदन देवून मागणीचा सतत पाठपुरावा केला होता.

         आज विधी मंडळात चर्चा होऊ या मागणीला यश येवुन सर्वसामान्य, गोरगरीब जनतेच्या, नागरिकांच्या घरकुलाचा मार्ग मोकळा झाला.

       त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकभाऊ नेते यांचे मनापासून आभार नगरसेवक आशिष पिपरे यांनी मानले आहे.