युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने खल्लार ठाणेदारांचा सत्कार..

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- युवा स्वाभिमान पार्टी खल्लार सर्कलच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला खल्लार पोलीस स्टेशनचे ठाणेदार राहुल झंझाळ यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

         खल्लार सर्कल मध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी युवा स्वाभिमान पार्टी सदैव पोलिस प्रशासनाच्या पाठीशी राहील असे आश्वासन पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आले.

       यावेळी प्रामुख्याने युवा स्वाभिमान पार्टीचे जिल्हाध्यक्ष  अजय देशमुख,दर्यापूर तालुका संघटक तथा सदस्य ग्रामपंचायत मोचर्डा अंकुश  रहाटे,विद्यार्थी स्वाभिमान पार्टीचे जिल्हा सचिव  शुभम उगले,तालुका उपाध्यक्ष शैलेश मेटकर,पवन लहाने,संदिप पाटील,महिला तालुका प्रमुख सौ.शारदा ताई कदुर,सुमित बोंडे,रणवीर राठोड,सचिन सदार,ऋषि सवई,सुनील कडू, दर्पण सवई,भुषण बोरखडे,शिवम ताजणे,मंगेश ठाकरे,सागर कारंडे,कार्तिक सवई,अर्पित केने,शिवराज जवंजाळ तसेच खल्लार सर्कल मधील सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.