
प्रितम जनबंधु
संपादक
नेवजाबाई हीतकारणी महाविद्यालय ब्रम्हपूरी येथे “कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि संधी” या विषयावर कृषीविषयक एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. आयोजीत कृषीविषयक एकदिवसीय कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी श्री. के. एम. नाईक सर मुख्याधपक ने. ही. विद्यालय ब्रम्हपुरी तर प्रमुख अतिथी म्हणून पर्यवेक्षक नाकाडे सर आदी मान्यवर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थीत होते.
ने. ही. विद्यालय ब्रम्हपूरी येथे होऊ घातलेल्या कृषीविषयक एकदिवसीय कार्यशाळेत मार्गदर्शन करीत असतांना शेती क्षेत्रात व्यवसायीकदृष्ट्या अग्रेशीत होण्यासाठी शेतकऱ्यांनी विशेषत्वाने शेतीउपयोगीत बाबी जाणुन घेण्यासाठी प्रथमतः साक्षर होण्याची विषेश गरज आहे असे प्रतिपादन तालुका कृषी विभाग ब्रम्हपूरी चे कृषी पर्यवेक्षक अमित केराम यांनी केले. ते नेवजाबाई हितकारीनी विद्यालयात “कृषी क्षेत्रातील आव्हाने आणि संधी” या विषयावर बोलत होते.
कृषी क्षेत्रामध्ये पारंपारिक पीक न घेता हवामान आणि जागेची योग्यता बघून जर पिकात बदल केला तर शेतीसुद्धा एक मोठा उद्योग आहे. असे प्रतिपादन यावेळी केराम यांनी केले. शेतीमध्ये कमी जागेत मशरूम व्यवसाय; शिंगाडा व्यवसाय आणि संशोधन करून पीक बदल करण्यासंबंधी माहिती दिली. सोबतच पर्यावरणाच्या अनुकूलतेसाठी रासायनिक शेतीचा त्याग करून सेंद्रिय शेती करावी त्यातून कृषीविघातक कीटकांचे नाश करुन शेतीउपयोगीत कीटकांचे सवर्धंन करता येइल. आणी त्यामुळे उत्पादन खर्च घटुन उत्पन्नात अगदीच दुप्पटीने वाढ होईल. असा आशावाद कृषीविषयक मार्गदर्शनातून केराम सर यांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला…
तद्वतच विद्यार्थ्यांशी संवाद साधून येत्या काळात यदाकदाचित “माती वीणा शेती” येवढा बदल होण्याची शक्यता वर्तवली या क्रांतिकारी बदलावर विद्यार्थ्यांची उत्सुकता वाढली व विद्यार्थ्यानी मार्गदर्शनीय सुसंवादात हस्तक्षेप करत कृषीविषयक प्रश्न विचारुन कार्यक्रम अधीक रंजक केला.
सदर एकदिवसीय कार्यशाळेप्रसंगी ने. ही. विद्यालयाचे वदनलवार सर, पराते सर, उपस्थीत होते. कार्यशाळेचे सुयोग्य संचालन एम. जी.उराडे यांनी केले तर आभार व्ही. एम. करंबे यांनी मानले. यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थीत राहुन कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेतला.