ऋषी सहारे
संपादक
आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा व गटप्रवर्तक संघटना चंद्रपूर शहर शाखेचा मेळावा स्थानिक संयुक्त खदान मजदुर संघ संलग्न आयटक कार्यालयात कॉ. प्रा.नामदेव कणाके जिल्हा सचिव भाकप यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून कॉ विनोद झोडगे राज्य सचिव आयटक , कॉ .प्रदीप चीताडे , कॉ.रवींद्र उमाटे जिल्हा संघटक आयटक, आशा वर्कर संघटनेच्या शहर सचिव कॉ प्रतीमा कायरकर, अधक्ष सविता गटलेवार ,नंदा माकडे,उषा उराडे यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.मेळाव्यात विविध मागण्या विषही चर्चा करण्यात आली. सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या , आशा वर्कर ला 18000 /-रु .व गटप्रवर्तक महिलांना दरमहा रूपये २५०००/– हजार किमान वेतन द्या.नियमीत दरमहा ५ तारखेच्या आत माणधन अदा करा .दर महिन्याला वेतन चिटी देण्यात यावे,संघटने सोबत दर 3 महिन्याला मनपा स्तरावर समस्या निवारण बैठक घेण्यात यावी .आशा वर्कर यांना डेंग्यू सर्व्हेसह ईतर वीणा मोबदला कोणतेही कामे सांगू नये.आशा व गट प्रवर्तक यांना आणलाईन कामे ज्यामधे PMMVY चे फार्म आणलाईन भरणे,U Win Portal वर लसीकरणाची Entry करणे,आभा आयडी कार्ड काढणे,E-KYC,इत्यादी करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईल फोन (स्मार्ट फोन) मुबलक डाटा पॅकसाठी पैसे,योग्य मोबदला व मराठीत ऍप उपलब्ध करून देण्यात यावे अन्यथा आणलाईन कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला .जिल्हा रुग्णालय येथील आशा घर नेहमी स्वछ ठेवण्यात यावा. दिवाळी भाऊबीज लागू करण्यात यावी.नवीन नियुक्त करण्यात आलेल्या आशा वर्कर ला ट्रेनिंग देण्यात यावी.आशा वर्कर मधून आरोग्य विभागात 50 टक्के जागांची भरती करा त्यांना पगारी सुट्टी,किरकोळ रजा,बाळंत पणाच्या पगारी रजा लागु करा . आशा वर्कर यांच्या कुटुंबातील सर्व सदक्ष यांची आरोग्य तपासणी शासकीय सेवेतून मोफत करण्यात यावी. आशा वर्कर यांना सामाजिक सुरक्षा लागू करा.आशा वर्करला सन्मानाची वागणूक द्या.या प्रमुख मागण्या विषही यावेळी चर्चा करण्यात आली व त्यानंतर आयुक्त मनपा व वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
स्थानिक मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास तीव्रआंदोलनाचा इशारा आयटक चे राज्य सचिव कॉ.विनोद झोडगे , कॉ.रवींद्र उमाटे,सविता गटलेवार,प्रतीमा कायरकर यांनी दिला आहे.