युवराज डोंगरे/खल्लार
उपसंपादक
जिल्हा पोलिस दल व पोलिस स्टेशन खल्लारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव ‘मेरी मिटटी मेरा देश ‘अभियान अंतर्गत देश रक्षणाच्या बलिदान दिलेल्या शुरविरांच्या कुटुंबियांचा व देशसेवा करणाऱ्या सेवानिवृत्त सैनिकांचा गुणगौरव व सत्कार सोहळा खल्लार पोलिस स्टेशन येथे स्वातंत्र्यदिनी थाटात साजरा करण्यात आला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ठाणेदार चंद्रकला मेसरे या होत्या.तर प्रमुख अतिथी म्हणून दर्यापूरचे ठाणेदार संतोष ताले, उपविभागीय कार्यालयातर्फे गजानन सोनोने, अशोक तायडे, रंगराव पुनसे, मोहन भिसे, रामकृष्ण चव्हान, भास्कर कडू, खल्लारचे सरपंच योगेश मोपारी, सौ पदमाताई नाचनकर मंचावर उपस्थित होते.
यावेळी खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील बाबुराव थोरात महिमापूर, रंगराव पुनसे कोकर्डा, सुखदेव वानखडे कोळंबी, अशोक तायडे चिंचोली शिंगणे, रंगराव सिरसाट जसापूर, नंदू गुडधे खल्लार, बाबाराव चौरपगार खल्लार, गंगाधर रंगारी चंद्रपूर, अनिल मोहोड खल्लार, संदिप पानगे,राजू खांडेकर नालवाडा, गजानन गिरी, उल्हास सगणे बद्रीनाथ भोंडे बेंबळा खुर्द, मुकींद वानखडे, गंगाधर वानखडे कान्होली, वासुदेव चौधरी, रामभाऊ चित्रकार, सदानंद दामले, नामदेव नवले कसबेगव्हान, शिल्पा मलघाम नरदोडा, अमोल सावरकर देऊळगाव, ओंकार गावडे फाजलपूर, मुगुटराव बुटे ,अशोक शेंदूरकर गौरखेडा या सेवानिवृत्त सैनिकांचा गुणगौरव करण्यात आला.
तर खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील सेवानिवृत्त पोलिस पाटील सुधिर बुरघाटे डोंगरगाव,रामकृष्ण चव्हान चिपर्डा, भास्कर कडू बोराळा, सौ पदमाताई नाचनकर मार्कंडा, मनोहर भिसे मिरझापुर, यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक संजय मेसरे यांनी संचालन आशिष गावंडे तर आभार प्रदर्शन गोपाल सोळंके यांनी केले हा सर्व कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी खल्लार पोलिस स्टेशनमधिल सर्वच पोलिस कर्मचारी,महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बॉक्स
खल्लार पोलिस स्टेशन येथे स्वातंत्र्यदिनी सेवानिवृत्त सैनिकांचा गुणगौरव व सत्कार समारंभ प्रथमच आयोजित करण्यात आला यानिमित्य खल्लार पोलिस स्टेशन हद्दीतील पोलिस पाटील संघटनेच्या वतीने कर्तव्यदक्ष ठाणेदार चंद्रकला मेसरे यांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.