रत्नदीप तंतरपाळे/ चांदूरबाजार तालुका प्रतिनिधी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या,”माझी माती माझा देश, या उपक्रमामध्ये खरवाडी ग्रामपंचायतीने सहभागी होऊन विविध सामाजिक उपक्रम राबविले.
सरपंच सौ प्रतिभाताई बंड यांच्या अध्यक्षतेखाली हे अभियान रविण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सर्वत्र सातारा केला जात असून ग्रामपंचायत खरवाडी येथे दिनांक ११ ऑगस्ट २०२३ ला सर्वप्रथम ग्रामपंचायत वतीने व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावातून मशाल रॅली काढून मेरा मिट्टी मेरा देश अशा घोषणा देऊन रॅली काढण्यात आली.
यामध्ये जिल्हा परिषद शाळेतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते व त्यानंतर ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांच्या उपस्थितीमध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.
शीला फलकाचे अनावरण सरपंच सौ प्रतिभाताई बंड यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर ग्रामपंचायत परिसरात ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्यातर्फे ७५ वृक्षारोपण करण्यात आले व गावातील नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले,असे विविध कार्यक्रम राबून हे अभियान साजरे करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला सरपंच सौ प्रतिभाताई बंड उपसरपंच सागर शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य विजयराव तंतरपाडे, अनिल खैरकार, प्रमिलाताई भोवते, कल्यानीताई भुरे, स्वातीताई मुंदेकर, ग्रामपंचायतचे सचिव रूपालीताई कोंडे, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका कोचे मॅडम पुष्पलता पाथरे, कोथलकर मॅडम , अंगणवाडी सेविका शालूताई कडू, जयश्री राऊत मदतनीस प्राची वाकोडे, निलिमा मोंढे, आशा सेविका सुनीता चोपडे, रोजगार सेवक राजेंद्र राऊत, ग्रामपंचायत कर्मचारी वंदना टेकाळे, संगीता वाकोडे,उज्वला वाकोडे,सुनीता तायडे,रोशन इंगळे,ऋषीकेश बंड व इतर गावातील नागरिक उपस्थित होते.