अनिलकुमार एन. ठवरे
ग्रामीण तालुका प्रतिनिधी आरमोरी
मानापुर :- बहुजन समाज पार्टी आरमोरी विधानसभा तर्फे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सवानिमित्ताने कार्यकर्ता मेळावा व समिक्षा बैठक बुद्धविहार मानापुर येथे पार पडली.
या मध्ये आजच्या सामाजिक व राजकीय घडमोडींवर चिंतन करून विस्तृत चर्चा करण्यात आली व कार्यकर्त्यांना तसे निर्देश देण्यात आले.
वरील कार्यक्रमाला मुख्य मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रभारी भिमजी राजभर उत्तर प्रदेश,ॲड. संदिप ताजणे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.त्यांनी आपल्या मार्गर्शनातून आजच्या जातीपातीच्या,भ्रष्टाचारी राजकारणापासून दूर जाऊन तथागत भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शांती,समता व बंधुता या धर्तीवर समाजकारण व राजकारण करावे असे निर्देश कार्यकर्त्यांना दिले.
या प्रसंगी प्रादिप खोब्रागडे जिल्हा प्रभारी,भिमराव पात्रिकर विधानसभा प्रभारी, कृपानंद सोनटक्के विधानसभा अध्यक्ष, माजी अध्यक्ष प्रा.शेंडे, उद्धवजी साखरे, जयदत बोदेले,ईश्वर बारसागडे, अनिलकुमार ठवरे, प्रतिष्ठित नागरिक, महिला व कार्यकर्ता उपस्थित होते.