युवराज डोंगरे /खल्लार
उपसंपादक
अमरावती विभाग
१४ जुलैला दुपारी दिड वाजताच्या सुमारास नालवाडा येथे ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने येथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतातील सोयाबीन,तूर, कपाशी ही पिके मोठ्या प्रमाणात बाधीत झाली आहेत.
या पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गाने केली आहे.
दिड ते दोन तास झालेल्या पावसाने नालवाडा येथिल १०० ते १२५ हेक्टर शेतातील सोयाबीन,तूर,कपाशी ही पिके बाधित झाली आहेत शेत शिवाराला नदी,तलावा सारखे स्वरुप प्राप्त झाले होते.अनेकांचे पिके खरडून गेली आहेत.यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आधीच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी वर्ग पुन्हा निसर्गाच्या लहरीपणामुळे पुन्हा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
*****
बॉक्स:-
दरम्यान काल झालेल्या पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे तलाठी निलेश वानखडे,कृषी सहाय्यक काळपांडे,कोतवाल शिवकुमार भोंडे,पोलिस पाटील आशिष गावंडे व गावकरी यांच्या उपस्थितीत करण्यात येत आहेत.