भाविक करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधि
धनोरा तालुक्यातील येरकड येथे 13 जुलै रोजी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम साजरा करण्यात आला.
आरोग्य विभाग ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने रॅली काढून जनजागृती करण्यात आली व स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले साथीचे आजाराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.सोबतच गावामध्ये फवारणी करण्याची असल्याने गावकऱ्यांनी सहकार्य करावे अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी सरपंच वासुदेव उसेंडी उपसरपंच सहारे ग्रामविकास अधिकारी जयंत मेश्राम स्वप्निल शिंपी कडपवार राठोड डांगे दडमल अमित शिंपी व गावातील ग्रामस्थ शिक्षक विद्यार्थी व ग्रामपंचायतचे कर्मचारी उपस्थित होते.