“जीवन,जन्म – मृत्यूच्या दरम्यानचा काळ… — भाग – 5

           61 ते 70 वर्षाच्या वयात प्रत्येक नागरिक हा निसर्गाच्या व त्याच्या तत्वज्ञानाच्या अधिक जवळ गेलेला असतो.निसर्गाच्या विविध अंगांना तो सहजतेने परिचित झालेला असतो. ज्याप्रमाणे आम्ही आमच्या स्वार्थासाठी जमिनीतील खनिज संपत्ती ( दगडी कोळसा, सोने, तांबे, पाणि इत्यादी ) काढण्यासाठी…….

        धरतीमातेच्या हृदयाची अक्षरंशा चाळणी करतो. पण तीची आपल्याबाबतीत कुठेही तक्रार नसते.पोटाशी धरून,बिलगवून ती आपला सांभाळ करते.अगदी आपल्या जन्मदात्या मातेप्रमाणे.म्हणूनच आपण तिला धरतीमाता म्हणतो…. 

          हे वरील प्रकारचे सुसंस्कार आपल्यावर कधी घडतात,जेंव्हा आपण 60 वर्षाच्या काळात वरील प्रकारच्या सुसंस्काराच्या अग्नीप्रवेशातून जाऊन अनुभवातून जाणीवेणे घडतो तेंव्हा.

          त्यासाठी तीन गुरूंच्या मार्गदर्शनातून हा आपला पिंड घडत जातो.प्रथम गुरु आपली जन्मदाती माता (आई)

     दुसरे गुरु…..

शिक्षक!,आणि आदर्श महापुरुष,तत्ववेत्ते

तिसरे आणि शेवटचे गुरु!….

       अनुभव वरील तिन्ही गुरूंच्या माध्यमातून जेंव्हा आपल्या सदसदविवेक बुद्धीची प्रगल्भता होते,तेंव्हा या वयात आपण प्रथम,”माणूस बनून, जबाबदार जगाचा नागरिक बनतो.

       या वयात आपल्यात नैतिकता ठासून भरलेली असल्यामुळे आपला घरात आणि समाजात नैतिक आदरयुक्त धाक निर्माण होऊन याचे वैचारिक तरंग समाजात आपोआप पसरतात आणि हा आदर्श इतरांच्या सदसदविवेक बुद्धीपर्यंत जाऊन बिलगतात तेंव्हा दुसरा माणूस तयार होऊन अशा माणसांची संख्या हळूहळूवाढत जाऊन एक जबाबदार देश निर्माण होऊन जगात त्या देशाची मान उंचावते….

          याच वयात हा जेष्ठ नागरिक वैचारिक आणि आचारिकदृष्ट्या एवढा प्रगल्भ झालेला असतो की, तो जगाचे वैचारिक नेतृत्व करण्यास लायक बनतो..

               तो जास्त निसर्गाच्या जवळ गेलेला असल्यामुळे,त्याला शारीरिक व्याधी खूप अल्प असतात किंवा नसतात. कारण या वयात त्याला मृत्यूची किंवा दुःखाची (शारीरिक व मानसिक) भीती जवळ फडकत सुद्धा नाही.

      कारण त्याला या पृथ्वीतलावर आई – बापाच्या पोटी जन्म घेण्याचा अर्थ कळालेला असतो.

          या वयात तो केवळ विचार, आचार,सुसंस्कारांचा इतरांना देणारा दाता असतो. त्याच्या शब्दाला लाख मोलाची किंमत असते.त्याच्या नजरेत एवढी ऊर्जा असते की, एका साध्या नजरेने कुटनीतीचा माणूस जाग्यावर जळून खाक होतो!

           तो या वयात मृत्यू आणि दुःखाशी मैत्री करतो म्हणून तीही त्याला त्रास देत नाहीत.कोणत्याही शारीरिक व्याधीसाठी दवाखान्याची त्याला गरज भासतच नाही.कोणत्याही मानसिक व्याधीचा तर प्रश्नच निर्माण होत नाही.

       या वयात तो विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी बनल्यामुळे,-“मानवता धर्माचा,अनुयायी व पाईक बनतो.म्हणजे आपोआपच वरील धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे..

          “भारताचे संविधान,या पवित्र ग्रंथाचा जागृत अनुयायी बनून त्यातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काचा अधिकार घेऊन इतरांच्या सदसदविवेक बुद्धीला जागृत करण्याचे आवाहन करतो.एक सर्वसामान्य भारतीय नागरिक अशा प्रकारे निर्माण होऊन देशाची व जगाची धुरा सांभाळण्याच्या लायक बनतो…

        याच वयात समोर केवढीही मोठी बलाढ्य शक्ती जरी उभी असली तरी त्या शक्तीला आपल्या नैतिक विद्वत्तेच्या बळावर नामोहरम करण्याची ऊर्जा प्राप्त होते आणि त्यात तो त्या बलाढ्य शक्तीचा पराभव करतो.

   याच शक्तीच्या बळावर……

      डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान पूर्ण करू शकले.

         अशा प्रकारे या वयात प्रत्येक भारतीय नागरिक तयार झाला पाहिजे.तेंव्हा कुठे “मेरा भारत महान,म्हणता येईल.

         परंतू,आज आमच्या देशाचा नागरिक या वयात अनेक शारीरिक व्याधीनी ग्रासलेला, दररोज डझनभर गोळ्या व औषधीवर कसेतरी जगणारा, उलट यामुळे त्रस्त होऊन देवाला मरण मागणारा. ऐन जवानीच्या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या क्षनैक व्यसनांना बळी पडून मानसिक आरोग्य घालून बसलेला ( याला जे अपवाद असतील त्यांच्यामुळेच जग चालत आहे ), स्वतःला त्रास आणि दुसऱ्यालाही त्रास होऊन बसणारा.परंतू अशाही काळात हजारो रुपये त्याला पेन्शन मिळत असतील तर घरातील सर्वजन त्याला उसने प्रेम द्यायला तत्पर असतात.जर तसे नसेल तर यांच्या मानसिक त्रासाला वैतागून कुटुंबातील सदस्य त्याला वृद्धाश्रमात किंवा अनाथाश्रमात टाकल्यामुळे यांचीच भरती फुल्ल झालेली असते.

            साठी बुद्धी नाठी याचा प्रत्यय घरात आणि बाहेर समाजात सुद्धा अनुभवायला मिळतो.

        एकंदरीत त्याच्या अशा प्रकारच्या जीवन व्यतीत करण्याच्या पद्धतीच्या कारणामुळे त्याची संतती सुद्धा 20 % त्याच मार्गाने जाणारी आपोआपच घडते.म्हणून देशात आणि राज्यात खरा भारतीय नागरिक संविधानाने केलेल्या आवाहनानुसार घडत नाही त्याचे मुख्य कारण हे आहे..

          परंतू,अशाही काळात एक अंकी टक्क्यानुसार का असेना वरील प्रकारच्या 70 वर्षातल्या सुसंस्कारानुसार भारतीय नागरिक घडलेले आहेत.त्यांच्यामुळेच तर जग टिकून आहे.

अशा जबाबदार नागरिकांना माझा सॅल्यूट….

    जागृतीचा आचारिक लेखक

               अनंत केरबाजी भवरे

      संविधान विश्लेषक,औरंगाबाद,रेणापूरकर, 7875452689…